• Download App
    अमेरिकेतील भारतीय वंशाची पहिली मिस वर्ल्ड श्री सैनी हिची काळजाला भिडणारी कथा|Heart touching story of Shree Saini First Indian-American to win the Miss world title

    अमेरिकेतील भारतीय वंशाची पहिली मिस वर्ल्ड श्री सैनी हिची काळजाला भिडणारी कथा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: अमेरिकेतील भारतीय वंशाची श्री सैनी ही मिस वर्ल्ड अमेरिका २०२१ टायटल जिंकणारी पहिली महिला ठरली आहे. ती पहिली एशियन आहे जिने हे टायटल जिंकले आहे. मूळच्या भारतातील असलेल्या श्री सैनीचे कुटुंब हे ती पाच वर्षाची असताना वॉशिंग्टन डीसी मध्ये स्थलांतरित झाले.Heart touching story of Shree Saini First Indian-American to win the Miss world title

    २५ वर्षे वय असलेल्या लुधियानातील श्री सैनीने लहानपणापासूनच नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळा आणि नृत्य वर्ग या दोन्हीमध्ये तिला भेदभावाला सामोरे जावे लागले. पण तिला तिच्या आईने परकीय देशात स्वतःची जागा निर्माण करण्याची प्रेरणा दिली.



    कसा होता श्री सैनीचा आत्तापर्यंतचा प्रवास?

    बारा वर्षाची असताना तिला एक दुर्मिळ हृदयरोग झाला. या दुर्मिळ रोगामध्ये हृदय फक्त प्रत्येक मिनिटाला वीस वेळा धडकते. (सामान्य माणसाचे हार्टबीट हे ७० टाइम्स पर मिनिट या वेगाने धडकते) त्यामुळे तिला हार्ट सर्जरीला सामोरे जावे लागले. तिच्या हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू राहावे यासाठी पेसमेकर बसवण्यात आला.

    तिला असे सांगण्यात आले की, तू एक सामान्य माणसाचे जीवन जगू शकणार नाहीस. तुला नृत्य सोडावे लागेल. पण तरीही तिने नृत्याची साथ सोडली नाही. श्री पंधरा वर्षाची असताना तिची आई आजारी पडली. या काळात श्रीला खूपच त्रास झाला.

    तिने डिप्रेशन तसेच इतर समस्यांना सामोरे जाण्यासाठी लोकांना मदत व्हावी या दृष्टीने एक एनजीओ स्थापन केले. तिच्यावर जी वेळ आली आणि तिला ज्या प्रकारे त्रास भोगावा लागला, अशी वेळ कोणावरच येऊ नये यासाठी तिने या एनजीओची स्थापना केली.

    त्यानंतर चार वर्षे झाल्यावर श्रीचा खूप मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये तिच्या चेहऱ्याचा काही भाग जळून गेला होता. डॉक्टरांनी सांगितले की बरे व्हायला एक वर्ष तरी लागेल. पण श्रीने हार मानली नाही. श्रीने एका महिन्याच्या आतच या समस्येवर मात केली.

    श्रीला वक्तृत्व कलासुध्दा अवगत आहे. कॉलेजमध्ये असताना तिने केलेल्या भाषणांचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक केले जायचे. २०१७ मध्ये तिने मिस इंडिया युएसए मध्ये भाग घेतला आणि त्याच्या आधीच्या वर्षी तिने मिस वर्ल्ड हे टायटल जिंकले. श्रीने युनिसेफ, डॉक्टर विथ आउट बॉर्डर्स आणि ब्रेस्ट कॅन्सर फाउंडेशनसाठीही काम केलेले आहे.

    मिस वर्ल्ड बनण्याचे स्वप्न श्रीने लहानपणापासूनच बाळगले होते. आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाऊन आपले स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा तिला लोकांना द्यायची आहे. शाळेतील तिला दिली गेलेली वागणूक, पेनफुल सर्जरी आणि अपघात या सगळ्याला सामोरं जाऊनसुद्धा तिने आपल्या स्वप्नाची साथ सोडली नाही. तिने या सर्व समस्यांतून मार्ग काढला व जिद्दीने यश मिळवले.

    Heart touching story of Shree Saini First Indian-American to win the Miss world title

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य