विशेष प्रतिनिधी
आझमगड – त्याचवेळी उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यात कोरोना लशीची विक्री करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कर्मचाऱ्याने गावकऱ्यांकडून पैसे घेऊन लस देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. Health employee arrested for vaccine fraud
आझमगड जिल्ह्यात तैनात केलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याने स्थानिक नागरिकांना डोसची विक्री केली. त्याला कोपागंज पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्या घरातून बेकायदापणे ठेवलेले डोस जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपी आरोग्य कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी आठ वाजता पोलिस अधिकाऱ्याच्या मोबाईलवर भदसा मानोपूर येथील एका नागरिकाचा फोन आला. पैसे घेऊन कोरोना लस देत असल्याची माहिती देण्यात आली. या नुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला आणि तेथे हरैया प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी पकडला.
या कारवाईची माहिती जिल्हा प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्याकडे रुग्णालयातून चोरीस गेलेले कोव्हॅक्सिनचे दहा डोस, कोव्हिशिल्डचे २४० डोस, ॲटी रेबीजचे दहा डोस आणि सहा ॲटीजेन किटही जप्त करण्यात आले आहे.
Health employee arrested for vaccine fraud
महत्वाच्या बातम्या
- बिहार, झारखंडमध्ये पुराचे थैमान; भागलपूरला सर्वाधिक मोठा फटका
- अफगाणिस्तानमध्ये लोकशाही व्यवस्था येणार नाही, शरीयत कायदा लागू करण्याचे तालिबानचे संकेत
- विज्ञानाची गुपिते : झाडातील विशिष्ठ् ग्रंथीमुळेच फुलांना येतो सुगंध
- महिला, मुलांवर क्रूर अत्याचार करणाऱ्या तालिबानला काही जणांचा निर्लज्जपणे पाठिंबा – योगी आदित्यनाथ यांची टीका
- अवघ्या एका नागरिकाला घेऊन रुमानियाचे विमान मायदेशी परतले