• Download App
    राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा। Hat trick of resignations One blow after another to BJP in UP, Cabinet Minister Dharamsinh Saini and MLA Vinay Shakya also resign

    राजीनाम्यांची हॅटट्रिक : यूपीमध्ये भाजपला एकापाठोपाठ एक धक्के, कॅबिनेट मंत्री धरमसिंह सैनी आणि आमदार विनय शाक्य यांचाही राजीनामा

    उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता योगी मंत्रिमंडळातील आयुष मंत्री धरम सिंह सैनी यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. त्याचवेळी औरैयाच्या बिधुना येथील आमदार विनय शाक्य यांनीही राजीनामा दिला आहे. फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनीही स्वामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देत राजीनामा दिला आहे. Hat trick of resignations One blow after another to BJP in UP, Cabinet Minister Dharamsinh Saini and MLA Vinay Shakya also resign


    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी भाजपला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आता योगी मंत्रिमंडळातील आयुष मंत्री धरम सिंह सैनी यांनीही आपला राजीनामा पक्षाकडे पाठवला आहे. त्याचवेळी औरैयाच्या बिधुना येथील आमदार विनय शाक्य यांनीही राजीनामा दिला आहे. फिरोजाबादमधील शिकोहाबादचे आमदार मुकेश वर्मा यांनीही स्वामी प्रसाद मौर्य यांना पाठिंबा देत राजीनामा दिला आहे.

    पक्षात योग्य सन्मान नाही – विनय शाक्य

    विनय शाक्य यांनी उत्तर प्रदेश भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे की, भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दलित, मागास आणि अल्पसंख्याक समाजातील नेते आणि लोकप्रतिनिधींकडे कोणतेच लक्ष दिले गेले नाही. योग्य सन्मान दिला नाही. पक्ष सोडलेले शाक्य हे आठवे आमदार आहेत.



    आतापर्यंत कोणी-कोणी दिला राजीनामा

    वर्मा आणि शाक्य यांच्याशिवाय बिल्हौरचे भगवती प्रसाद सागर, शाहजहांपूरचे रोशन लाल वर्मा यांनीही राजीनामा दिला आहे. अवतार सिंह भडाना, ब्रजेश प्रजापती यांनीही उत्तर प्रदेश भाजप अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.

    उद्या सर्व आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

    योगी सरकारचे माजी कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंगळवारी आणि माजी मंत्री दारा सिंह चौहान यांनी बुधवारी पक्षाचा राजीनामा दिला. हे दोन्ही माजी मंत्री उद्या, शुक्रवारी त्यांच्या समर्थक आमदारांसह समाजवादी पक्षात प्रवेश करतील, अशा चर्चा सुरू आहेत.

    Hat trick of resignations One blow after another to BJP in UP, Cabinet Minister Dharamsinh Saini and MLA Vinay Shakya also resign

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य