• Download App
    चीन विरुद्धच्या फिलिपिन्सच्या लढ्याला भारताचे ब्रह्मोस बळ, क्षेपणास्त्रांसाठी पहिली ऑर्डर मिळवून संरक्षण क्षेत्राने रचला इतिहास|hāsa India's BrahMos force to Philippines fight against China

    चीन विरुद्धच्या फिलिपिन्सच्या लढ्याला भारताचे ब्रह्मोस बळ, क्षेपणास्त्रांसाठी पहिली ऑर्डर मिळवून संरक्षण क्षेत्राने रचला इतिहास

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : चीन विरुद्धच्या फिलिपिन्सच्या लढ्याला भारताने ब्रह्मोसचे बळ दिले आहे. या क्षेपणास्त्रांसाठी पहिली ऑर्डर मिळवून संरक्षण क्षेत्राने इतिहास रचला आहे.भारताला स्वदेशी बनावटीच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासाठीची पहिली ऑर्डर मिळाली आहे.hāsa India’s BrahMos force to Philippines fight against China

    फिलीपिन्स या देशासोबत भारताचा हा करार झाला असून, फिलीपिन्सच्या संरक्षण मंत्रालयाने क्षेपणास्त्रांच्या पुरवठ्यासाठी ब्रह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत ३७४ मिलीयन डॉलरच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. फिलीपिन्स हा अमेरिकेचा मित्र देश असला तरी चीनविरुद्धच्या लष्करी तयारीसाठी त्यांनी भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांवर विश्वास टाकला.



    बीएपीएल इंडो-रशियन संयुक्त उपक्रमांतर्गत सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्रह्मोसची निर्मिती करते. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, युद्धनौका, विमान किंवा जमिनीवरुन सोडले जाऊ शकते. भारतीय लष्कराने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अनेक मोक्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि इतर महत्त्वाची शस्त्रे तैनात केली आहे.

    हा करार भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. ब्रह्मोस निर्यात ऑर्डर या क्षेत्रातील देशासाठी सर्वात मोठी असेल आणि शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारताला पुढे नेण्याची मोठी पायरी ठरेल. आता इतर मित्र देशांकडूनही क्षेपणास्त्रासाठी अधिक ऑर्डर अपेक्षित आहे.

    hāsa India’s BrahMos force to Philippines fight against China

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार