Coronil Kit : हरियाणात कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट केले की, कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली आणि निम्मा खर्च हरियाणा सरकार कोविड रिलीफ फंडातून करणार आहे. Haryana Government To Distributed One Lakh Coronil Kit To Covid-19 Patients Free in State
विशेष प्रतिनिधी
चंदिगड : हरियाणात कोरोना रुग्ण लवकर बरे होण्यासाठी पतंजलीच्या एक लाख कोरोनिल किटचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री अनिल विज यांनी ट्वीट केले की, कोरोनिलचा निम्मा खर्च पतंजली आणि निम्मा खर्च हरियाणा सरकार कोविड रिलीफ फंडातून करणार आहे.
आरोग्यमंत्री म्हणाले की, कोरोनिलमुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचा दावा केला जातो. म्हणूनच हरियाणामधील लोकांचे आरोग्य व उपचारासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये सरकार कोणतीही कमतरता सोडू इच्छित नाही, आम्ही शक्य तितके प्रयत्न करत आहोत.
विरोधक शेतकर्यांचे हितचिंतक नाहीत : वीज
26 मे रोजी आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी संयुक्त किसान मोर्चाच्या देशपातळीवरील आंदोलनाच्या आवाहनास विरोधी पक्षांच्या पाठिंब्यावर कठोर टीका केली. वीज म्हणाले की, विरोधी पक्ष हे शेतकर्यांचे हितचिंतक नाहीत. जर ते असते तर त्यांनी त्यांना लसीकरण व चाचणी करण्यास प्रवृत्त केले असते. त्यांना विरोधी पक्षांना प्रश्न केला की, त्यांनी शेतकऱ्यांना लसीकरणासाठी कधी विचारले का? असे म्हटले असते तर विरोधी पक्ष हे त्यांचे हितचिंतक ठरले असते. हे त्यांच्यासाठी घातक आहे.
Haryana Government To Distributed One Lakh Coronil Kit To Covid-19 Patients Free in State
महत्त्वाच्या बातम्या
- Narada Sting Case : नजरकैदेतील तृणमूल नेत्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- PNB SCAM : पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी बेपत्ता, अँटिगुआ पोलिसांकडून शोध सुरू
- Toolkit Case : दिल्ली पोलिसांनी ट्विटर ऑफिसवर छापेमारी नाकारली, म्हणाले – फक्त नोटीस दिली, छापा नव्हता!
- फायझर आणि मॉडर्नाकडे आधीच पुष्कळ ऑर्डर, लसीसाठी भारताला प्रदीर्घ वाट पाहावी लागण्याची शक्यता
- Cool PPE Kits : आता पीपीई किट्स घालून घामाघूम होणार नाहीत डॉक्टर्स, मुंबईच्या संशोधकाने तयार केले व्हेंटिलेशन पीपीई किट्स