• Download App
    हरियाणा सरकारने घातली गौरखधंदा शब्दावर बंदी, संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखू नये म्हणून निर्णय|Haryana government bans the word 'Gaurakhdhanda', decides not to hurt the feelings of Sant Gorakhnath's followers

    हरियाणा सरकारने घातली गौरखधंदा शब्दावर बंदी, संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखू नये म्हणून निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    चंदीगड: अनैतिक कृत्ये आणि गैरव्यवहारांप्रकरणी सामान्यपणे ‘गोरखधंदा’ हा शब्द वापरण्यात येतो. मात्र, हरयाणा सरकारने या शब्दाच्या वापरावर बंदी घातली आहे. ‘गोरखधंदा’ या शब्दामुळे एका समाजाच्या भावना दुखवल्या जात आहेत.Haryana government bans the word ‘Gaurakhdhanda’, decides not to hurt the feelings of Sant Gorakhnath’s followers

    यामुळे या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या शब्दामुळे संत गोरखनाथ यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या जात आहेत, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले.
    गोरखनाथ समाजाच्या एका प्रतिनिधी मंडळाच्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या शब्दाच्या वापराने मनं दुखावली जात आहेत.



    यामुळे हरयाणात या शब्दावर बंदी घालावी, अशी मागणी समाजाच्या प्रतिनिधींनी केली. या शब्दाच्या नकारात्मक अथार्मुळे गोरखनाथ यांच्या अनुयायींच्या भावना दुखावत असल्याचे मनोहरलाल खट्टर म्हणाले.
    गुरु गोरखनाथ हे महान संत होते.

    यामुळे कुठल्याही भाषेत, भाषणात किंवा इतर कुठल्या संदर्भात हा शब्द वापरण्याने त्यांच्या अनुयायांचे भावना दुखावल्या जात आहेत. यामुळे कुठल्याही संदर्भात या शब्दाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे, असं खट्टर यांनी स्पष्ट केलं.

    Haryana government bans the word ‘Gaurakhdhanda’, decides not to hurt the feelings of Sant Gorakhnath’s followers

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : अनिल अंबानींविरुद्ध सीबीआयने दाखल केले आरोपपत्र; येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावरही 2,796 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

    Online Gaming : 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑनलाइन गेमिंग कायदा लागू; IT मंत्री म्हणाले- आम्ही प्रथम गेमिंग उद्योगाशी चर्चा करू

    Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानला हरवले; सैन्य ही अशी जागा, जिथे घराणेशाही नाही