• Download App
    मुंबईत गॉस्पेल चर्च, आश्रमाच्या अतिक्रमणावर हातोडा; बाल लैंगिक शोषणावरून फादरला अटक Hammer on encroachment of Gospel Church, Ashram in Mumbai

    मुंबईत गॉस्पेल चर्च, आश्रमाच्या अतिक्रमणावर हातोडा; बाल लैंगिक शोषणावरून फादरला अटक

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईतील सीवूड येथे बेकायदा उभ्या असलेल्या गाॅस्पेल आश्रम आणि त्यातील चर्चच्या अतिक्रमणावर अतिक्रमण विरोधी विभागाने हातोडा चालविला आहे. येथील फादरला बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली होती. Hammer on encroachment of Gospel Church, Ashram in Mumbai

    सीवूड येथील बेथेल गाॅस्पेल चर्च चालवत आलेल्या बेकायदेशीर बालकाश्रमामध्ये 4 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चर्चचे सर्व अनधिकृत बांधकाम नवी मुंबई महापालिका आणि सिडको यांनी संयुक्त कारवाई करुन उद्ध्वस्त केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता.



    अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

    ऑगस्ट 2022 मध्ये ठाणे जिल्हा बाल संरक्षण युनिटने एका एनजीओसोबत या चर्चवर छापा घातला होता. चर्चच्या आवारात 45 अल्पवयीन मुले- मुली आढळून आली. सर्व अल्पवयीन मुलांना वायुवीजन नसलेल्या अंधाऱ्या आणि छोट्या खोल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांना शिळे अन्नही देण्यात येत होते.

    इथल्या फादरने आपला विनयभंग केल्याचे तीन मुलींनी पोलिसांना सांगितले. या अल्पवयीन मुलांना ठाणे जिल्ह्यातील विविध बालगृहात पाठविण्यात आले. छाप्याच्या एका आठवड्यानंतर, चर्चच्या 55 वर्षीय धर्मोपदेशकाला एनआरआय कोस्टल पोलिसांनी अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

    Hammer on encroachment of Gospel Church, Ashram in Mumbai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistans : पाकिस्तानचा कबूलनामा : भारताच्या प्रत्युत्तर कारवाईत ११ सैनिक ठार, ७८ जखमी

    Operation Sindoor : पाकिस्तानला आत घुसून मारणार, बचावाची एकही संधी नाही देणार; आदमपूर हवाई तळावरून मोदींची गर्जना!!

    Dr. Subbanna Ayyappan : पद्मश्री डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांचा संशयास्पद मृत्यू; श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत मृतदेह आढळला