• Download App
    हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हेनल मॉइज यांची गोळ्या झाडून हत्या। Haitee president killed

    हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोव्हेनल मॉइज यांची गोळ्या झाडून हत्या

    वृत्तसंस्था

    पोर्ट औप्रिन्स : हैतीचे अध्यक्ष जोव्हेनल मॉइज (वय ५३) यांची हल्लेखोरांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर देशात गोंधळाचे आणि भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान क्लाउडे जोसेफ यांनी पोलिस आणि लष्कराच्या मदतीने देशाची सूत्रे तात्पुरती स्वत:च्या हाती घेतली असून देशात दोन आठवड्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. Haitee president killed



    मॉइज यांच्या घरात काल पहाटेच हल्लेखोर घुसले होते. त्यांनी मॉइज आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. यामध्ये मॉइज यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत चार संशयित हल्लेखोरांना ठार मारले असून दोघा जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांना ओलिस ठेवलेल्या तीन पोलिस अधिकाऱ्यांचीही सुटका करण्यात आली आहे.

    गरीबी, संघर्ष आणि राजकीय अस्थिरता यामुळे अनेक महिन्यांपासून हैतीमध्ये अस्थैर्य आहे. प्रचंड गरीबी असलेल्या या देशात ६० टक्क्यांहून अधिक कामगार दिवसाला केवळ दोन डॉलर कमावतात.

    Haitee president killed

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!