• Download App
    गुपकार आघाडीच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण खलबते, सरकारबद्दल नाराजी GUPKAR leaders talks in Valley

    गुपकार आघाडीच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण खलबते, सरकारबद्दल नाराजी

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – जम्मू-काश्मी्रबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीबाबत गुपकार आघाडीने नाराजी व्यक्त केली. गुपकार आघाडीच्या नेत्यांमध्ये नुकतीच महत्त्वपूर्ण खलबते पार पडली.GUPKAR leaders talks in Valley

    या बैठकीला आघाडीचे अध्यक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, तारिगामी, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते हसनैन मसुदी, पीपल्स मुव्हमेंटचे प्रमुख जावेद मुस्तफा मीर आणि आवामी नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष मुझफ्फर अहमद शहा हे देखील यावेळी उपस्थित होते.

    ‘‘ केंद्राच्या बाजूने विश्वायस निर्मितीच्या उपाययोजनांबाबत मोठी उदासीनता दिसून आली. राजकीय नेते आणि अन्य कैद्यांना सोडण्यास देखील केंद्र सरकार फारसे उत्सुक दिसत नव्हते.’’ असे या आघाडीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    गुपकारचे प्रवक्ते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते एम.वाय. तारिगामी म्हणाले की, ‘‘ जम्मू- काश्मीकरमधील लोकांपर्यंत पोचायचे असेल तर आधी विश्वाेसाचे वातावरण तयार करणे गरजेचे आहे. सर्वसामान्य जनता हीच या प्रक्रियेतील सर्वांत मोठी भागधारक आहे कारण तिनेच आतापर्यंत खूप काही सोसले आहे.’’ दडपशाहीच्या वातावरणामुळे २०१९ पासून जम्मू-काश्मीररची गळचेपी होते आहे, असेही या आघाडीकडून सांगण्यात आले.

    GUPKAR leaders talks in Valley

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!