• Download App
    गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार |Gujrat govt. tooks massive steps for covid treatment

    गुजरातमध्ये नवे तज्ज्ञ डॉक्टरना आकर्षक मानधन, कोरोना रुग्णांवर होणार खासगी रुग्णालयांत उपचार

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरात सरकारने राज्यातील सर्व खासगी रुग्णालये, चिकित्सालये, शुषृशा गुहे आणि दवाखान्यांना १५ जूनपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचाराची परवानगी दिली आहे. नवे तज्ज्ञ डॉक्टर आकर्षक मानधनावर नियुक्त करण्याचा निर्णयही झाला.Gujrat govt. tooks massive steps for covid treatment

    राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. रुग्णालयांना सरकारकडे कोणतीही परवानगी मागावी लागणार नाही, पण जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांना कोरोना रुग्णांची माहिती कळवावी लागेल.



    दरम्यान, तीन महिन्यांसाठी नवे तज्ज्ञ डॉक्टर व आवश्यक कर्मचारी नेमण्याचाही निर्णय झाला. त्यानुसार दरमहा तज्ज्ञ डॉक्टरांना अडीच लाख, वैद्यकीय अधिकाऱ्यांना सव्वा लाख, दंतरोगतज्ज्ञांना ४० हजार, आयुष-होमिओपॅथी डॉक्टरांना ३५ हजार रुपये मानधन मिळेल.

    बाहेरील संस्थांकडून नेमल्या जाणाऱ्या तृतीय श्रेणीतील परिचारिकांना दरमहा वीस हजार रुपये मिळतील.सर्व प्रकारच्या प्रशिक्षित डॉक्टर व निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी पुढे यावे असे आवाहन रुपानी यांनी केले.

    Gujrat govt. tooks massive steps for covid treatment

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य