प्रतिनिधी
गांधीनगर – हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता आणि संविधान या विषयी गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी केलेले वक्तव्य प्रसार माध्यमे वादग्रस्त म्हणून चालवताहेत. प्रत्यक्षात त्यात वादग्रस्त काय हे मात्र माध्यमे सांगताना दिसत नाहीत. जो पर्यंत भारतात हिंदू समाज बहुसंख्य राहील, तोपर्यंतच देशात धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संविधान टिकेल, असे वक्तव्य नितीन पटेल यांनी केले आहे. Gujrat DYCM Nitin Patel said, if hindu remains in majority then only secularism, constitution will remain into existance in india… otherwise…
गांधीनगरमध्ये भारतमाता मंदिरात विश्व हिंदू परिषदच्या वतीने मूर्ति प्रतिष्ठापना महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना नितीन पटेल म्हणाले, की या देशात काही लोक संविधान, धर्मनिरपेक्षतेसंदर्भात बोलतात. मात्र आज तुम्ही हा व्हिडीओ रेकॉर्ड करायचा तर करा किंवा माझे शब्द लिहून ठेवा पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत हिंदू बहुसंख्यांक आहेत तोपर्यंतच संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा या गोष्टी भारतामध्ये अस्तित्वात असतील. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल आणि दुसऱ्यांची वाढू लागले तेव्हा धर्मनिरपेक्षता, लोकसभा, संविधान काहीच वाचणार नाही. सर्वकाही झुगारुन दिलं जाईल, गाडून टाकलं जाईल, काहीच शिल्लक राहणार नाही असं मत व्यक्त केले.
नितीन पटेल यांच्या वरील वक्तव्याचा अर्थ मुसलमानांविरोधात असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. मात्र, त्यांनी प्रत्यक्षात मुसलमानांविरोधात एकही शब्द उच्चारलेला नाही. ते म्हणाले की मी सरसकट सर्वांबद्दल हे वक्तव्य करत नाही. मला हे सांगावेसे वाटतेय की लाखो मुस्लीमही देशभक्त आहेत. लाखे ईसाई देशभक्त आहेत. गुजरात पोलीस दलामध्ये हजारो मुस्लीम आहेत ते सर्वच देशभक्त आहेत.
गुजरातचे गृहमंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यासहीत विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Gujrat DYCM Nitin Patel said, if hindu remains in majority then only secularism, constitution will remain into existance in india… otherwise…
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई