• Download App
    गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये भररस्त्यात हमरीतुमरी, हाणामारीचे फोटो व्हायरल । Gujrat Congress Women Leaders Fight in Bhavnagar During Rally Photos Viral

    गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये भररस्त्यात हमरीतुमरी, हाणामारीचे फोटो व्हायरल

    Gujrat Congress Women Leaders Fight : गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. भावनगरमध्ये बुधवारी काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान महिला अध्यक्षांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. काँग्रेसने बुधवारी रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान दोन्ही महिला नेत्या एकमेकांशी भिडल्या. Gujrat Congress Women Leaders Fight in Bhavnagar During Rally Photos Viral


    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरात काँग्रेसच्या दोन महिला नेत्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. भावनगरमध्ये बुधवारी काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान महिला अध्यक्षांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली. काँग्रेसने बुधवारी रॅलीचे आयोजन केले होते. रॅलीदरम्यान दोन्ही महिला नेत्या एकमेकांशी भिडल्या.

    भावनगर शहरात काँग्रेसने कन्सारा पाडल्याच्या मुद्द्यावर घेराव घातला असताना दोन महिला काँग्रेस नेत्या एकमेकींशी भिडल्या. माजी काँग्रेस महापौर आणि माजी महिला अध्यक्ष यांच्यात हाणामारी झाली. यानंतर काँग्रेसच्या इतर नेत्यांनी या दोन्ही महिला नेत्यांना समजावले आणि प्रकरण शांत केले.

    कॉंग्रेसकडून भावनगरमधील कंसारा पाडल्याच्या निषेधार्थ घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, दोन महिला काँग्रेस नेत्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसच्या माजी महापौर पारुल त्रिवेदी आणि माजी महिला अध्यक्षा यांच्यात हाणामारी झाली. दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकींची कॉलर पकडली.

    पक्षातील वर्चस्वाबाबत दोन महिला नेत्यांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेस नेते भरतभाई बुधेलिया यांनी दोन महिला नेत्यांना वेगळे करून परिस्थिती शांत केली. हाणामारीदरम्यान माजी महापौर पारुल त्रिवेदी यांच्या डोळ्याला दुखापत झाली.

    माजी महापौरांना दुखापतींमुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. काँग्रेसचे मोठे नेते याप्रकरणी वक्तव्य करणे टाळत आहेत. त्याच वेळी माजी महापौर पारुल त्रिवेदी पोलिसांकडे तक्रार करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    Gujrat Congress Women Leaders Fight in Bhavnagar During Rally Photos Viral

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!