cm vijay rupani resigns : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष काल गुजरातला पोहोचले होते. या भेटीनंतरच रूपाणी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्यपालांना भेटल्यानंतर रुपाणी यांनी स्वतः राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. gujrat cm vijay rupani resigns from his post after meeting governor
वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष काल गुजरातला पोहोचले होते. या भेटीनंतरच रूपाणी राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. राज्यपालांना भेटल्यानंतर रुपाणी यांनी स्वतः राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतल्यानंतर रूपाणी यांनी आपला राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना रूपाणी म्हणाले, ‘माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करतो. माझ्या कार्यकाळात मला ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडताना पंतप्रधान मोदींकडून विशेष मार्गदर्शन मिळत आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गुजरातने नवीन आयामांना स्पर्श केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘गुजरातसाठी मला जी काही संधी मिळाली त्यासाठी मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. आता हा प्रवास नव्या नेतृत्वाखाली पुढे गेला पाहिजे. हे लक्षात घेऊन मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्याची जबाबदारी काळानुसार बदलत राहणे ही भाजपची परंपरा आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती कार्यकर्ते पूर्ण समर्पणाने पार पाडतात.
gujrat cm vijay rupani resigns from his post after meeting governor
महत्त्वाच्या बातम्या
- कर्नालमध्ये शेतकरी आणि सरकारमधील वाद मिटला, लाठीचार्जमध्ये जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या; अधिकारी रजेवर
- माजी आयपीएस, लेखक इक्बाल सिंग लालपुरांबद्दल जाणून घ्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद भूषवणारे देशातील दुसरे शीख
- साकीनाका ‘निर्भया’ प्रकरण : ३० वर्षीय पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, आरोपी गजाआड, महाराष्ट्रातून संतापाची लाट
- Honey Trap : भारतीय लष्कराचे गुप्त दस्तऐवज पाकिस्तानी महिला एजंटला पुरवले, टपाल सेवा अधिकाऱ्याला अटक
- Bigg Boss OTT : शिल्पा शेट्टीने बहीण शमिताला दिला पाठिंबा , चाहत्यांना मतदान करण्याचे केले आवाहन