• Download App
    गुजरात निवडणूक : काँग्रेस टाळतेय मोदी विरुद्ध राहुल लढाई; भाजपचा पराभूत जागांवर जोरGujrat assembly Elections : Congress avoiding direct fight between Modi and Rahul, BJP concentrating on ruler area

    गुजरात निवडणूक : काँग्रेस टाळतेय मोदी विरुद्ध राहुल लढाई; भाजपचा पराभूत जागांवर जोर

    विशेष प्रतिनिधी

    अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्याचे मतदान 8 दिवसांवर आले असताना सर्वच पक्ष प्रचारात जोर लावत आहेत. पण अर्थातच भाजप काँग्रेस आणि आम आदमी पार्टी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार आपापल्या प्रचाराची मोहीम राबवत आहेत. Gujrat assembly Elections : Congress avoiding direct fight between Modi and Rahul, BJP concentrating on ruler area

    भाजप गेल्या निवडणुकीत पराभूत झालेल्या 50 जागांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित करून आपला संभाव्य तोटा भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस मात्र 2022 च्या निवडणुकीत अधिक सावध पावले टाकून ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल अशी होताच कामा नये, याची विशेष काळजी घेताना दिसत आहे. 2017 च्या निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातची निवडणूक आपण विरुद्ध राहुल गांधी अशी खेचून आणण्यात यशस्वी झाले होते. त्यामुळे तेव्हा भाजपची टॅली जरी 100 च्या खाली आली असली तरी ती पूर्णपणे नव्वदीत घसरली नाही, तर बरोबर 99 वरच थांबू शकली. पण भाजपला आता थोडी सुद्धा रिस्क घ्यायची नाही. त्यामुळे पराभूत झालेल्या 50 जागांवर पक्षाने मायक्रो लेव्हलला नियोजन करून प्रचार चालवला आहे, तर काँग्रेस ही निवडणूक कोणत्याही स्थितीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होताच कामा नये, असा चंग बांधून ग्रामीण भागात प्रचारावर भर देत आहे. राहुल गांधींच्या गुजरात मध्ये फक्त दोन 2 आयोजित करण्यामागचे हे खरे कारण आहे. भाजप, काँग्रेस आणि आपच्या नेत्यांनी 125 पेक्षा अधिक सभा आणि रोड शो केले. भाजपने सोमवारी 93 मतदारसंघांत सभा घेतल्या.

    भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या फीडबॅक युनिटने 15 दिवसांत दिल्लीला पाठवलेल्या अहवालात भाजपसाठी डोकुदुखी ठरणाऱ्या 50 मतदारसंघांचा उल्लेख आहे. अहवालानुसार, आम आदमी पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या लाभार्थींशी संपर्क साधून त्यांना वेगवेगळ्या याेजनांंतर्गत लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यावर भाजपची तोड म्हणून या भागातील जनसंपर्कासाठी घरोघरी प्रचार वाढवण्याचा सल्ला दिला आहे.



     पराभूत जागांवर मोदींच्या सभा

    भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १०९ जागांवर २४ सभा घेत आहे. या पैकी ४५ जागा भाजप हरला हाेता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५ दिवसांपासूनच्या तुफान प्रचारात १६ जिल्ह्यांतील १०९ मतदारसंघ कव्हर करण्याची तयारी केली आहे. अनुसूचित जमातींचे ९ व अनुसूचित जातींचे ९ मतदारसंघ ते कव्हर करतील. २०१७ च्या निवडणुकीत मोदींनी ३८ सभा घेतल्या होत्या. मतदानाआधी मोदी रोड शो आणि डोअर-टू-डोअर प्रचारही करतील.

     राहुल मुद्दामच निवडणुकीपासून लांब

    गावांत छोट्या सभांवर भर या वेळी काँग्रेसची व्यूहरचना वेगळी आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत फक्त 2 सभा घेतल्या आहेत. त्यात त्यांनी आदिवासी कार्ड खेळले. काँग्रेसला गुजरात विधानसभेची निवडणूक अजिबात मोदी विरुद्ध राहुल अशी होऊच द्यायची नाही कारण या लढाईत आपला तोटा होतो याची पक्की जाणीव काँग्रेसच्या नेत्यांमध्ये रुजली आहे त्यामुळे काँग्रेसने ठरवून राहुल गांधींना प्रचारातून बाजूला ठेवलेले दिसते. पण काँग्रेसने ग्रामीण भाग आणि आदिवासी भागात जोर लावला आहे. छोट्या सभा आणि डोअर-टू-डोअर भेटींद्वारे मतदारांशी संपर्क साधला जात आहे.

    आम आदमी पार्टीचे रोड शो

    आप : रोड शो आणि डोअर-टू-डोअर मोहीम, २ नेतेच प्रचार कार्यात आम आदमी पक्षाचे लक्ष रोड शो आणि डोअर-टू-डोअर जनसंपर्क मोहिमेवर आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एक डझनपेक्षा अधिक रोड शो केले आहेत.

    अमित शाह : तीन दिवसांत १० सभा, यातील ५०% जागांवर मागील वेळी पराभव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान १० मतदारसंघांत सभा घेतल्या. २०१७ मध्ये यापैकी 5 जागांवर पराभव झाला होता. अध्यक्ष जे. पी. नड्डा, 6 मुख्यमंत्री, 10 पेक्षा अधिक केंद्रीय मंत्री, अर्धा डझन खासदार आणि स्टार प्रचारक दररोज 90 मतदारसंघांत सभा घेत आहेत.

    Gujrat assembly Elections : Congress avoiding direct fight between Modi and Rahul, BJP concentrating on ruler area

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!