डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) मोजून त्यावर मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे आहे. एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट प्रमाणपत्रही घेतले जाते. विमा, बॅँक आदी कारणांसाठी एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट घेतली जातात असे गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी म्हटले आहे. Gujarat Home Minister claims that it is wrong to calculate death number by counting death certificate, even duplicate certificate for the same person.
विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : डेथ सर्टिफिकेट (मृत्यूचा दाखला) मोजून त्यावर मृत्यूचा आकडा काढणे चुकीचे आहे. एकाच व्यक्तीसाठी डुप्लीकेट प्रमाणपत्रही घेतले जाते. विमा, बॅँक आदी कारणांसाठी एकापेक्षा जास्त सर्टिफिकेट घेतली जातात असे गुजरातचे मुख्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनी म्हटले आहे.
एका गुजराती दैनिकाने 1 मार्च 2021 ते 10 मे 2021 पर्यंत डेथ सर्टिफिकेटच्या डाटाच्याआधारावर एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार राज्यातील 33 जिल्हे आणि 4 नगरपालिकेद्वारे 71 दिवसात आतापर्यंत 1,23,871 डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. या वर्षाच्या मार्च महिन्यात राज्यात एकूण 26,026 डेथ सर्टिफिकेट जारी करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये ही संख्या वाढून 57,796 आणि मे महिन्याच्या सुरुवातीच्या 10 दिवसात 40,051 पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गुजरात सरकार मृत्यूचे आकडेल् लपवित असल्याचा आरोप होत आहे.
यावर पत्रकारांशी बोलताना जडेजा म्हणाले, एखादी व्यक्ती मृत झाल्यावर अनेक कामांसाठी त्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र लागते. त्यामुळे अनेक वेळा डुप्लीकेट प्रमाणपत्र दिले जाते. विमा, बॅँक, पेन्शन यासारख्या सेवांसाठी मुळ प्रमाणपत्र मागितले जाते. ते देणे सरकारचे कर्तव्य असते. त्यामुळे उद्या कोणी ही सगळी प्रमाणपत्रे मोजली आणि त्यावरून मृत्यूचा आकडा काढला तर ते चुकीचे होईल.
जडेजा म्हणाले, गुजरातमध्ये मृत्यूचा दाखला देण्याची व्यवस्था ऑनलाईन आहे. त्यामुळे लोक घरातूनच आवश्यक असल्यास प्रमाणपत्र काढून घेऊ शकतात. त्यामध्ये एकाच व्यक्तीच्या मृत्यूचे अनेक वेळा रजिस्ट्रेशनही दिसते. त्याचबरोबर कुटुंबियातील सदस्याच्या मृत्यूनंतर लोक लगेच प्रमाणपत्र घेत नाहीत. अनेकदा तर वर्षभराने प्रमाणपत्र घेतले जाते. त्यामुळे हे सगळे मृत्यू एकाच विशिष्ट कालावधीतील आहेत असे मानणे चुकीचे होईल.
गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. आजारातून बरे होणाºयांचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी याप्रकारच्या आरोपांमुळे लोकांमध्ये घबराट पसरते असेही जडेजा म्हणाले.
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी यावर खुलासा दिला होता. ते म्हणाले होते की, सरकार कोणतेही आकडे लपवित नाही. कोमॉर्बिडमुळे मृत्यू झालेल्यांचे आकडे कोरोनाच्या मृत्यूंमध्ये सामील करण्यात आलेले नाहीत. सरळ शब्दात सांगायचं झालं तर एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल आणि त्यातच तिला मधुमेह, हार्ट वा किडनीशी संबंधित गंभीर आजारांनी ग्रस्त असेल तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं मानलं जात नाही.
Gujarat Home Minister claims that it is wrong to calculate death number by counting death certificate, even duplicate certificate for the same person.
महत्त्वाच्या बातम्या
- गाझापट्टीतील संघर्ष आणखी पेटला, इस्राईलच्या हवाई हल्ल्यांमध्ये २३ ठार
- उत्तर प्रदेशातील २६ वर्षांच्या तरुणीकडून गरजू रुग्णांना विनामूल्य ऑक्सिजन सिलिंडर
- जगातील निम्मे लसीकरण श्रीमंत देशांमध्येच, गरीब देशांत लशींचा मोठा तुटवडा
- भारताविरोधी बातम्या देणार्या जगभरातील माध्यमांना ऑस्ट्रेलियाचे दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडनने खडसावले
- Cyclone Tauktae update : महाराष्ट्रात ४५२६, गुजरातमध्ये २२५८ मच्छिमार बोटी खवळलेल्या समुद्रातून किनारपट्टीवर सुरक्षित परतल्या
- केंद्राचे राज्यांना निर्देश, आठवड्याचे सर्व दिवस उशिरापर्यंत खुली ठेवा रेशन दुकाने, गरिबांना अडचणीविना मिळावे मोफत धान्य