वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी शुक्रवारी म्हटले की, संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायदा तोपर्यंत राहील, जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत आणि समुदाय अल्पसंख्याक बनला तर काहीही शिल्लक राहणार नाही. पटेल यांनी गांधीनगरमधील भारत माता मंदिर येथे हे विधान केले. हे राज्यातील भारत मातेचे पहिले मंदिर मानले जाते. Gujarat Deputy CM Nitin Patel says Constitution secularism and law in the country Till Hindus are in majority
विश्व हिंदू परिषदेद्वारे आयोजित मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवावर पटेल म्हणाले की, आपल्या देशात काही लोक संविधान, धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतात. पण मी तुम्हाला सांगतो आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा असेल तर करा. माझे शब्द लक्षात घ्या. लोक संविधान, धर्मनिरपेक्षता आणि कायद्याबद्दल बोलतील जोपर्यंत देशात हिंदू बहुसंख्य आहे. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होऊ लागेल आणि इतरांची संख्या वाढू लागेल तेव्हा ना धर्मनिरपेक्षता, ना लोकसभा, ना संविधान टिकेल. सर्व काही हवेत उडून जाईल, गाडले जाईल. काहीही शिल्लक राहणार नाही.
लाखो मुस्लिम देशभक्त
या वेळी गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांच्यासह विहिंप आणि आरएसएसचे प्रमुख नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मी प्रत्येकाबद्दल बोलत नाही. मीदेखील स्पष्ट केले पाहिजे. लाखो मुस्लिम भक्त आहेत, लाखो ख्रिश्चन देशभक्त आहेत. गुजरात पोलीस दलात हजारो मुस्लिम आहेत. ते सर्व देशभक्त आहेत.
धर्मांतरविरोधी कायदा
उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्याबद्दलही मत मांडले. लग्नाद्वारे जबरदस्तीने धर्मांतरण रोखण्यासाठी सरकारने हा कायदा केला होता. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मकतेला आव्हान देणाऱ्या काही याचिकांनंतर, कायद्याच्या काही कलमांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे गुजरात सरकारचे म्हणणे आहे.
हिंदू मुलावरही कारवाई केली जाईल
पटेल म्हणाले की, कायद्याला आव्हान देणारी रिट याचिका एका संस्थेने दाखल केली होती. ते म्हणाले की मला त्या संस्थेला विचारायचे आहे की, जर हिंदू मुली हिंदूंशी, मुस्लिम मुली मुस्लिमांशी, ख्रिश्चन मुली ख्रिश्चनांशी, शीख मुलींनी शीखांशी लग्न केले तर त्यांना काय अडचण आहे. मी स्पष्ट करतो की, जर एखाद्या हिंदू मुलाने फसवणूक करून एका निष्पाप मुस्लिम मुलीशी लग्न केले, तर हा कायदा त्यालाही लागू होतो. त्यामुळे हा कायदा कोणत्याही विशिष्ट धर्मासाठी नाही.
Gujarat Deputy CM Nitin Patel says Constitution secularism and law in the country Till Hindus are in majority
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई