• Download App
    #SilverGirl भाविना पटेलला गुजरात सरकारचा तीन कोटींचा दिव्यांग स्पोर्ट्स पर्सनचा पुरस्कार |Gujarat CM Vijay Rupani congratulates #BhavinaPatel, for winning a Silver medal at Paralympic Games

    #SilverGirl भाविना पटेलला गुजरात सरकारचा तीन कोटींचा दिव्यांग स्पोर्ट्स पर्सनचा पुरस्कार

    वृत्तसंस्था

    गांधीनगर : टोकियो पॅरा ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकण्याचा पराक्रम करणाऱ्या भाविना पटेल या दिव्यांग खेळाडूला गुजरात सरकारने तीन कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.Gujarat CM Vijay Rupani congratulates #BhavinaPatel, for winning a Silver medal at Paralympic Games

    गुजरात सरकारच्या दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या योजनेतून हा पुरस्कार भाविना पटेल हिला देण्यात येईल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी जाहीर केले. भाविना पटेल ही गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. पॅरा ऑलिंपिक तसेच एकूण ऑलिंपिकमध्ये टेबल टेनिस खेळात भारताला पदक मिळवून देणारी ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.



    भाविनाने रौप्य पदक मिळविल्यानंतर देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला असून त्याला विविध पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये आत्तापर्यंतचा सर्वात जास्त रकमेचा तीन कोटी रुपयांचा पुरस्कार गुजरात सरकारने जाहीर केला आहे.

    राष्ट्रीय क्रीडा दिनी तिने रौप्यपदक मिळवल्याबद्दल देशवासीयांना विशेष आनंद झाला आहे. सोशल मीडियावर राष्ट्रीय क्रीडा दिन, भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या बरोबरीने भाविना पटेल देखील ट्रेंड होताना दिसते आहे.

    Gujarat CM Vijay Rupani congratulates #BhavinaPatel, for winning a Silver medal at Paralympic Games

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!