वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप संपलेला नाही, असा इशारा तज्ज्ञांचा दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सणासुदींच्या दिवसांसाठी केंद्र सरकारनं देशाती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत. सण साजरा करताना सावधगिरी आणि सुरक्षितता पाळणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
Guidelines of central Government for Upcoming Festival Season
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Rajesh Bhushan) यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून कोविड प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ होऊ नये यासाठी मानक कार्यप्रणाली (SOP) पाळणे आवश्यक असल्याचं म्हणलं आहे.
कोविडशी संबंधित योग्य वर्तन आणि नियमांच उल्लंघन झाल्यास सरकारनं दंडात्मक कारवाईसाठी पावले उचलली, असंही आरोग्य सचिवांनी सांगितलं आहे.देशातील प्रतिबंधित क्षेत्र (Prohibited Areas) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागात आणि 5 टक्क्यांपेक्षा जास्त संसर्ग दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जाऊ नये, असं निर्देश देण्यात आले आहे.
याशिवाय सण साजरा करताना खबरदारी घेण्यासाठी संबंधित राज्य सरकारांकडून आधीच पुरेशा आवश्यक सूचना जारी करायला हव्यात. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑनलाइन मेळावे, ऑनलाइन खरेदी करण्यास आणि अनावश्यक प्रवास टाळण्यासाठी विविध पद्धतींचा तपास करण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे.
Guidelines of central Government for Upcoming Festival Season
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकरची धाड, 26 कोटींची रोख आणि 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड; नोटा मोजताना अधिकारीही झाले घामाघूम
- Aryan Khan case : संजय राऊत म्हणाले – साक्षीदाराचा दावा धक्कादायक; नवाब मलिक म्हणाले- सत्याचाच विजय होईल!
- Aryan Khan Drug Case : फरार गोसावीच्या साथीदाराचा धक्कादायक खुलासा! एनसीबीने धमकावून घेतल्या कोऱ्या पंचनाम्यावर सह्या, 18 कोटींच्या डीलपैकी 8 कोटी समीर वानखेडेंना?
- राहुल आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अल्लू मियाँला लखनौमध्ये अटक, फसवणूक आणि खंडणीचे प्रकरण