GST Council Meeting : आज जीएसटी परिषदेची 43वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे 8 महिन्यांनंतर होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिपिंग एमआरओवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. पादत्राणे, कपड्यांवरील कर सुलभ होईल. लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्जमाफी योजना शक्य आहे. कोरोनाशी संबंधित वस्तूंवर कर कमी केला जाऊ शकतो. GST Council Meeting Today After 8 months Chaired By FM Nirmala Sitharaman
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आज जीएसटी परिषदेची 43वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे 8 महिन्यांनंतर होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत शिपिंग एमआरओवरील जीएसटी 18 टक्क्यांवरून 5 टक्क्यांपर्यंत कमी करता येईल. पादत्राणे, कपड्यांवरील कर सुलभ होईल. लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्जमाफी योजना शक्य आहे. कोरोनाशी संबंधित वस्तूंवर कर कमी केला जाऊ शकतो.
याशिवाय राज्यांना होणार्या नुकसान भरपाईच्या मुद्द्यावरही चर्चा होईल. जीएसटी परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी असतात.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर कर कमी करण्याची मागणी
जीएसटी परिषदेच्या बैठकीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या आयातीवर कर लावण्याबाबत नवीन निर्णय घेतला जाऊ शकतो. सध्या जीएसटी 12 टक्के दराने आकारला जातोय. कोविड मदतीसाठी राज्य सरकार किंवा त्यांच्याद्वारे अधिकृत एजन्सीने आयात केलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरवर सरकारने आयजीएसटीला सवलत दिली आहे.
कोरोनावरील औषधांवरून हटवण्याची मागणी
सध्या कोरोना लसीचा देशांतर्गत पुरवठा आणि व्यावसायिक आयातीवर 5% जीएसटी आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, कोरोनावरील औषध, लसीवरील जीएसटी काढून टाकल्यास औषधे महाग होतील.
जीएसटी काढून टाकल्यामुळे त्यांचे उत्पादक उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर भरलेल्या करासाठी इनपुट-टॅक्स-क्रेडिट दावा करू शकणार नाहीत. परिणामी, ते याची भरपाई किंमत वाढवून ग्राहकांकडून करतील.
GST Council Meeting Today After 8 months Chaired By FM Nirmala Sitharaman
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाचे निर्माते आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बनवणार चित्रपट, महेश मांजरेकर करणार दिग्दर्शन
- RBI ने म्हटले- आर्थिक वर्ष 2021 मध्ये 2000च्या नोटाची छपाई नाही, नोटबंदीनंतर 500 च्या नोटा चलनात सर्वाधिक
- परराष्ट्रमंत्र्यांचा अमेरिका दौरा, जयशंकर म्हणाले- कोरोनाविरुद्धच्या युद्धात भारत आणि अमेरिकेच्या मजबूत भागीदारीची आवश्यकता
- पंतप्रधान मोदींचा ओडिशा-बंगालमधील ‘यास’ चक्रीवादळ बाधित भागाचा दौरा, आढावा बैठकीत ममतांचाही सहभाग
- भारताला सोपवण्याएवेजी फरार मेहुल चौकसीला अँटिग्वाला परत देणार डोमिनिका सरकार