• Download App
    पेटीएमची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, ३५० कर्मचारी बनणार करोडपतीGreat gift to Paytm employees, 350 employees will become millionaires

    पेटीएमची कर्मचाऱ्यांना मोठी भेट, ३५० कर्मचारी बनणार करोडपती

    पेटीएम कंपनी शेअर बाजारात लवकरच नोंदणीकृत होणार आहे. मात्र, नोंदणीच्या पूर्वीच कंपनीचे ३५० कर्मचारी चक्क करोडपती होणार आहेत. याचे कारण म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पूर्वीच कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. Great gift to Paytm employees, 350 employees will become millionaires


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पेटीएम कंपनी शेअर बाजारात लवकरच नोंदणीकृत होणार आहे. मात्र, नोंदणीच्या पूर्वीच कंपनीचे ३५० कर्मचारी चक्क करोडपती होणार आहेत. याचे कारण म्हणजे या कर्मचाऱ्यांनी पूर्वीच कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.

    पेटीएमच्या वतीने नुकताच आयपीओ आणण्यात आला आहे. त्याला फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, १८ नोव्हेंबर रोजी कंपनीची शेअर बाजारात अधिकृत नोंदणी होणार आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत शेअरचे अलॉटमेंट होण्याची शक्यता आहे. यावेळी कळणार की कोणाला पेटीएमचे शेअर मिळाले आहेत.


    डेबिट कार्ड घरीच विसरलात? काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून असे काढा पैसे


    त्याच दिवशी शेअरचा भाव ठरणार असल्याने गुंतवणुकदारांना त्यांच्या कमाईचा हिशोब समजळार आहे. या आयपीओच्या माध्यमातून पेटीएम १८,६०० कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविण्याची शक्यता आहे. देशातील आजपर्यंतचा हा सर्वात मोठा आयपीओ मानला जातो. यापूर्वी कोल इंडियाचा आईपीओ १५ हजार कोटी रुपये होता.

    आयपीओसाठी पेटीएमने आपले प्रति शेअर मूल्य २०८० ते २१५० रुपये ठरविले होते. एका लॉटमध्ये सहा शेअर आहे. कंपनीचे मूल्य १.३९ कोटी रुपये आहे. शेअर बाजारात कंपनी नोंदणीकृत झाल्यावर शेअरचे मूल्य ठरेल आणि ३५० कर्मचारी करोडपती होतील.

    Great gift to Paytm employees, 350 employees will become millionaires

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?