• Download App
    नोकरी गमावलेल्यांना लाखो कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, सरकार २०२२ पर्यंतचा ‘पीएफ’ भरणार Govt will pay PF of lakhs of people

    नोकरी गमावलेल्यांना लाखो कामगारांना मोदी सरकारचा मोठा दिलासा, सरकार २०२२ पर्यंतचा ‘पीएफ’ भरणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – कोरोनाकाळात नोकरी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला आता केंद्र सरकार धावून आले असून या कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंतचा भविष्यनिर्वाह निधीचा हप्ता आता सरकारकडूनच भरण्यात येणार आहे. Govt will pay PF of lakhs of people

    कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेमध्ये ज्यांनी नावनोंदणी केली आहे अशा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या या नव्या योजनेचा लाभ मिळू शकेल.



    मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून याचा दूरगामी परिणाम रोजगार निर्मितीवर देखील झाला आहे. ज्यांच्यावर नोकऱ्या गमावण्याची वेळी आळी अशा कर्मचाऱ्यांचा २०२२ पर्यंतचा भविष्यनिर्वाह निधीचा संपूर्ण हप्ता आता केंद्र सरकार भरणार आहे.

    असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे २५००० किंवा त्यापेक्षा जास्त मजूर- कामगार आपल्या मूळ स्थानी परतले असतील तर त्यांना त्यांच्या गावात केंद्र सरकारच्या १६ योजनांचाही लाभ मिळेल.

    Govt will pay PF of lakhs of people

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी