विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने राज्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन कोटी डोस अतिरिक्त देण्याची घोषणा केली असून, आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्याची सूचना राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. तसेच नागरिकांना दुसरा डोस देण्याकडेही लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. Govt will give 2 Cr doses to states
देशातील कोरोनाची लाट ओसरल्याने काही राज्यांमध्ये शाळा सुरू होऊ लागल्या आहेत. त्यामुळे शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा विचार केंद्र प्राधान्याने करीत आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीत आज देशातील लसीकरणाचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना २७ ते ३१ ऑगस्ट या काळात दोन कोटी जादा डोस वितरित करण्यात येणार आहेत. त्याचा वापर प्रामुख्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी प्राधान्याने करायचा आहे.
शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देताना, ज्यांचा दुसरा डोस राहिला आहे, देण्याबाबतही सूचना राज्यांना करण्यात आली आहे. याबरोबरच येत्या काळ सणासुदीचा असल्याने कोविड योग्य वर्तन आणि नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याबाबत खबरदारी घेण्याबाबत राज्यांना सांगण्यात आले आहे.
Govt will give 2 Cr doses to states
महत्त्वाच्या बातम्या
- पूजा बेदींनी सरकारच्या लसीकरण अभियानाला म्हटले ‘भयंकर’ आणि ‘अनावश्यक’, हे आहे कारण..
- चोरी ४,२५० कोटींची, तीही चक्क किरणोत्सर्गी पदार्थांची, एक ग्रॅमची किंमत तब्बल १७० कोटी, चोरट्यांना अटक पण चोरी कोणत्या प्रयोगशाळेतून सापडेना
- ओवेसींपासून ते कॉंग्रेसपर्यंत अफगाणिस्तानप्रश्नी सर्व राजकीय पक्ष एकत्र, अफगाणिस्तानच्या लोकांची मैत्री महत्त्वाची असल्याची मांडली भूमिका
- अनुराधा पौडवाल भाजपाच्या वाटेवर, उत्तराखंड निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्यांना बांधली राखी