वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून टोमॅटो 70 रुपये किलो दराने विकणार आहे. ग्राहक व्यवहार विभागाने (DOCA) नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) यांना 20 जुलैपासून ₹70/किलो या किरकोळ किमतीत टोमॅटो विकण्याचे निर्देश दिले आहेत.Govt to sell tomatoes at Rs 70 per kg from today, many cities including Delhi-Rajasthan, UP will get it cheaper
टोमॅटोच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी सरकारने 14 जुलै रोजी योजना लागू केली. या योजनेअंतर्गत एनसीसीएफ आणि नाफेडने 90 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री सुरू केली. यानंतर सरकारने टोमॅटोचे दर 16 जुलै रोजी 10 रुपयांनी कमी करून 80 रुपये केले. त्याचवेळी आता पुन्हा एकदा टोमॅटोच्या दरात घट झाली आहे.
नाफेड-एनसीसीएफने 10 जुलैपर्यंत 391 मेट्रिक टन टोमॅटोची खरेदी केली
शासनाच्या आदेशानंतर दोन्ही एजन्सींनी टोमॅटोची 120 ते 130 रुपये किलो दराने खरेदी करून कमी दराने विक्री सुरू केली. 10 जुलैपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने एकूण 391 मेट्रिक टन टोमॅटोची खरेदी केली होती. हे टोमॅटो दिल्ली-एनसीआर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील प्रमुख केंद्रांमधून विकले जात आहेत. NCCF चे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ यांनी सांगितले होते की, केंद्र सरकार यामुळे होणारे नुकसान सहन करेल.
एकूण उत्पादनात दक्षिण आणि पश्चिम क्षेत्रांचा वाटा सुमारे 60%
टोमॅटोचे उत्पादन जवळपास प्रत्येक राज्यात होते. तर देशाच्या एकूण उत्पादनात दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील प्रदेशांचा वाटा सुमारे 60% आहे. भारतातील इतर भागांमध्ये टोमॅटोचा सतत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी या प्रदेशांमधील अतिरिक्त उत्पादनाचा वापर केला जातो.
Govt to sell tomatoes at Rs 70 per kg from today, many cities including Delhi-Rajasthan, UP will get it cheaper
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!