• Download App
    झारखंडमधील तरुण न्यायाधीशांचा मृत्यूला सरकारचा जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाकडून सुरक्षेबाबत चिंता |Govt responsible for murder of district judge

    झारखंडमधील तरुण न्यायाधीशांचा मृत्यूला सरकारचा जबाबदार, सर्वोच्च न्यायालयाकडून सुरक्षेबाबत चिंता

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली – न्यायाधीशांना मिळणाऱ्या धमक्या व अपमानास्पद संदेश याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत आयबी आणि सीबीआय हे न्यायसंस्थेला अजिबात मदत करीत नाहीत स्पष्ट शब्दांत सागितले.Govt responsible for murder of district judge

    झारखंडमधील धनबादमधील न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या संदिग्ध मृत्यूनंतर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी देशभरातील न्यायाधीशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. अनेक फौजदारी खटल्यामंध्ये गँगस्टर आणि उच्चपदस्थ, प्रसिद्ध व्यक्तींचा सहभाग असतो आणि दुसरीकडे काही न्यायालयांचे अगदी उच्च न्यायालयांतील न्यायाधीशांनाही धमकावले जात आहे.



    न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूप्रकरणी सरन्यायाधीश म्हणाले की, न्यायाधीशांच्या वसाहतीला सुरक्षा का पुरविली गेली नाही. एका तरुण न्यायाधीशांचा मृत्यू झाला आहे, याला सरकार जबाबदार आहे. धनबादमध्ये कोळसा माफिया सक्रिय आहेत, अशा वेळी न्यायाधीशांना संरक्षण कोण पुरवणार?, अशा सवालही त्यांनी केला.

    न्यायाधीशांच्या वसाहतीला चारी बाजूंनी सीमाभिंत बांधली आहे, या झारखंड सरकारचे वकील राजीव रंजन यांच्या उत्तरावर असमाधान व्यक्त करीत गँगस्टरसाठी सीमाभिंत पुरेशी ठरत नाही. त्यापेक्षा जास्त सुरक्षा व्यवस्था आखायला हवी, अशी अपेक्षा सरन्यायाधीश रमण यांनी व्यक्त केली.

    Govt responsible for murder of district judge

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Operation sindoor : भारत – पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, पण फक्त फायरिंग थांबवल्याचा भारताचा खुलासा!!

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी