विशेष प्रतिनिधी
ग्वाल्हेर : केंद्र सरकारने आतापर्यंत नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले असून आताही आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार आहोत. केंद्र सरकार कृषी कायद्यांव्यतिरिक्त अन्य मुद्यांवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करायला तयार आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. Govt. ready to talks with farmers
मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. वाढत्या महागाईबाबत बोलताना तोमर म्हणाले की,‘‘ खाद्यतेल आणि डाळींच्या दरांवर सरकारचे बारकाईने लक्ष आहे.
केंद्र सरकारने आपला साठा खुला केल्यानंतर डाळी आणि तेलाच्या किमती कमी झाल्या. मोहरीच्या तेलाच्या किमती वाढण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे त्याची शुद्धता जपण्यासाठी सरकारने त्यामध्ये अन्य तेल मिसळण्यास मज्जाव केला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईन.’’
Govt. ready to talks with farmers
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र सरकारचे कोरोना व्यवस्थापन!, बऱ्या झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे घरच्यांना कळविले
- पावसाच्या येता सरी, मुंबई पाण्याने भरी, मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी.
- कोरोना लसीकरणासाठी लोक कल्याण योजना, गोरगरीबांनाही घेता येणार खासगी रुग्णालयांत लस
- मार्गात संकटे ठाण मांडून बसतात तेव्हाच कृतिशील व्हा
- बालकांवरील उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाइन्स, रेमडेसिव्हीरचा वापर करता येणार नाही