• Download App
    करनाल येथील गोळीबाराच्या निष्पक्ष चौकशीस अखेर हरियाना सरकार तयार |Govt ready for inquiry for Karnal firing

    करनाल येथील गोळीबाराच्या निष्पक्ष चौकशीस अखेर हरियाना सरकार तयार

    गृहमंत्री अनिल विज: कोणाच्या म्हणण्यावरून फाशी देता येत नाहीGovt ready for inquiry for Karnal firing


    विशेष प्रतिनिधी

    चंडीगड – करनाल घटनेची निष्पक्ष चौकशी करण्यास हरियाना सरकार तयार असल्याचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले. आयएएस अधिकाऱ्याचे वादग्रस्त व्यक्तव्य आणि पोलिसांचा लाठीमार आणि शेतकऱ्याचा मृत्यू या संपूर्ण प्रकरणाचा चौकशीत समावेश असेल.

    चौकशीदरम्यान अधिकारी, शेतकरी किंवा कोणताही शेतकरी नेता दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही विज यांनी स्पष्ट केले.२८ ऑगस्ट रोजी करनाल येथे भाजपच्या कार्यक्रमाकडे जाणाऱ्या शेतकरी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला आणि त्यात दहा जण जखमी झाले. यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.



    यादरम्यान, आंदोलकांनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास त्यांची डोकी फोडा असे वक्तव्य करणारे आयएएस अधिकारी आयुष सिन्हा यांची क्लिप व्हायरल झाली. शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे सिन्हा यांची बदली करण्यात आली. परंतु बदली करणे ही शिक्षा होऊ शकत नाही, असे शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.

    Govt ready for inquiry for Karnal firing

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!