• Download App
    बाहेरील राज्यांतील नोंदणी असलेली वाहनेही जम्मू- काश्मीरमध्ये आता चालवता येणार|Govt. order cancelled by high court regarding vehicles

    बाहेरील राज्यांतील नोंदणी असलेली वाहनेही जम्मू- काश्मीरमध्ये आता चालवता येणार

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : अन्य राज्यात नोंदणी केलेली वाहने जम्मू-काश्मी रमध्ये चालविण्यासाठी त्यांची फेरनोंदणी करण्याविषयी काश्मी्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रसिद्ध केलेले परिपत्रक जम्मू-काश्मीदर उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल ठरवले.Govt. order cancelled by high court regarding vehicles

    उच्च न्यायालयाने हे परिपत्रक रद्द केल्याने बाहेरील राज्यांतील नोंदणी असलेली वाहने चालक जम्मू- काश्मीिर व अन्यय राज्यांमध्ये चालवू शकतील. त्यासाठी फेरनोंदणी अथवा कोणत्याही प्रकारचा रस्ता कर द्यावा लागणार नाही.



    न्या. अली महमंद माग्रे आणि न्या. विनोद चॅटर्जी कौल यांनी परिपत्रक रद्द केल्याचा आदेश दिला. वकील झहूर अमहद भट यांनी या परिपत्रकाविरोधात याचिका दाखल केली होती.

    मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार वाहनांची नोंदणी करतानाच कायमस्वरूपी कर वसूल केला जातो. यामुळे केवळ जम्मू-काश्मीररमध्ये वाहनांची नोंदणी नाही, या कारणावरून अजून कर लादू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

    Govt. order cancelled by high court regarding vehicles

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका