• Download App
    लसींचे दर कमी करण्याबाबत केंद्राची सीरम व भारत बायोटेकला विचारणा, 1 मेपासून सुरू होणार तिसरा टप्पा । Govt asks Serum, Bharat Biotech to lower price of Covid vaccines

    लसींचे दर कमी करण्याबाबत केंद्राची सीरम व भारत बायोटेकला विचारणा, १ मे पासून सुरू होणार तिसरा टप्पा

    price of Covid vaccines : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून एक मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आता लस तयार करणार्‍या सीरम व भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना लसींच्या किमती कमी करण्याविषयी विचारणा केली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील 18 वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेकला कोविड-19 वरील लसींची किंमत कमी करण्यास सांगितले आहे. Govt asks Serum, Bharat Biotech to lower price of Covid vaccines


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्न चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून एक मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले आहे. केंद्र सरकारने आता लस तयार करणार्‍या सीरम व भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांना लसींच्या किमती कमी करण्याविषयी विचारणा केली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील 18 वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील सर्वांना लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेकला कोविड-19 वरील लसींची किंमत कमी करण्यास सांगितले आहे.

    लसींच्या किमतीवरून वाद

    या वर्षाच्या सुरुवातीस कोरोनाविरुद्ध लढा देण्याकरिता आपत्कालीन वापरासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या दोन लसींना डीसीजीआयने मान्यता दिली. यानंतर जानेवारीच्या मध्यापासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली होती. आता ही लस 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना दिली जाणार आहे. यासाठी कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमती जाहीर केल्या आहेत. सीरम राज्य सरकारला 400 रुपये दराने, तर खासगी रुग्णालयात 600 रुपये दराने डोस देणार आहे. दुसरीकडे, भारत बायोटेकनेही किंमत जाहीर केली आहे. कोव्हॅक्सिनचा दर डोस खासगी रुग्णालयांना 1200 रुपये आणि राज्य सरकारांना 600 रुपयांना दिला जाईल.

    लसीच्या किंमती जाहीर झाल्यापासून विविध पक्षांनी टीकेचा सपाटा लावला आहे. लसीचे दर एकच ठेवले पाहिजेत, अशी मागणी विरोधकांची आहे. केंद्र सरकारला सध्या दीडशे रुपयांना एक डोस मिळत आहे. सीरम संस्थेने असा युक्तिवाद केला आहे की, लस तयार करण्यासाठी अधिक संसाधनांची आवश्यकता आहे, ज्यामुळे किंमत वाढली आहे.

    अनेक राज्यांत लसीकरण विनामूल्य

    1 मेपासून सुरू होणार्‍या लसीकरण मोहिमेसाठी अनेक राज्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, केरळ, राजस्थान, महाराष्ट्र यासह अनेक राज्यांनी आपल्या नागरिकांना विनामूल्य कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे.

    Govt asks Serum, Bharat Biotech to lower price of Covid vaccines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार