वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकार कच्च्या तेलाचा ५० लाख बॅरलचा राखीव साठा खुला करणार आहे.त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे. Government to open 50 lakh barrels of oilreserves; fuel prices Will fall
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महागाई वाढली आहे. राखीव इंधनाचा साठा खुला केल्याने सामान्य नागरिकांना इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घटत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने तेल उत्पादक संघटनेच्या (ओपेक) सदस्य देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्याची विनंती केली होती. मात्र, त्याकडे ‘ओपेक’ देशांनी काणाडोळा केला. ओपेक देशांच्या या धोरणाला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने भारतासह जपान आणि चीन यांना इंधनाचा राखीव साठा वापरण्यास काढण्याचे आवाहन केले होते. त्यास भारताने सकारात्मक प्रतिसाद दिला. जपानही या निर्णयासाठी अनुकूल असून चीनने निर्णय कळवलेला नाही.
राखीव साठा म्हणजे काय?
आपत्कालीन परिस्थितीत इंधनाची टंचाई भासू नये यासाठी प्रत्येक देशाकडे कच्च्या तेलाचा राखीव साठा असतो. इंधनाच्या वाढत्या किमतीवर तोडगा काढण्यासाठी राखीव साठा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. भारत प्रथमच कच्च्या तेलाचा राखीव साठा वापरणार आहे. देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील तीन ठिकाणांवर हा साठा आहे.
घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरू
घरगुती गॅसवरील सबसिडी पुन्हा सुरू
काेराेनाकाळात सबसिडी बंद हाेती. मात्र, आता ग्राहकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होत आहेत. सध्या नेमकी किती सबसिडी दिली आहे, हे स्पष्ट नाही.
Government to open 50 lakh barrels of oilreserves; fuel prices Will fall
महत्त्वाच्या बातम्या
- नबाब मलिक यांनी ट्विट केलेला संवादाचा स्क्रीनशॉट फेक, क्रांती रेडकर यांची सायबर सेलकडे तक्रार
- हंगामी पोलीस महासंचालक लोकसेवा आयोगाच्या महासंचालक पदाच्या यादीत नाहीत, हेमंत नगराळे, डॉ. के. वेंकटेशम, रजनीश सेठ शर्यतीत
- ममता बॅनर्जी यांची राजकीय पावले; छोटा पॅकेट बडा धमाका!!
- शेतकऱ्यांसाठी कायदे केले, देशासाठी मागे घेतले, वीर सावरकरांच्या शिकवणुकीतूनच पंतप्रधानांनी घेतला निर्णय