वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या १९१.९९ लाख डोस १६ ते ३१ मे या कालावधीत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत दिले जाणार आहेत. याबाबतची घोषणा शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली. Government Of Indian will provide 192 lakh Vaccine Dose’s free to Sates
कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचे कसे वितरण होणार आहे, त्याचा तपशील अगोदर देण्यात येणार आहे. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संबंधित अधिकाऱ्यांना या लशींच्या वापराबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात
आणि लशींचा अपव्यय होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.या १९१.९९ लाख डोसपैकी १६२.५ लाख डोस कोव्हिशिल्डचे आहेत, तर २९.४९ लाख डोस कोव्हॅक्सिनचे आहेत.
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना किती लशी उपलब्ध होणार आहेत त्याची आगाऊ सूचना देण्यामागे त्यांनी परिणामकारक योजना आखण्याचा उद्देश आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.