आखाती देशांत काम करणाऱ्या भारतीयांना भारत सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्याच्या पगारावर प्राप्तीकर आकारला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे. Government of India provides relief to salaried employees working in Gulf countries, no income tax will be levied on salaries
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आखाती देशांत काम करणाऱ्या भारतीयांना भारत सरकारने दिलासा दिला आहे. या कर्मचाऱ्याच्या पगारावर प्राप्तीकर आकारला जाणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली आहे.
तृणमूल कॉँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून भारतामध्ये नवी वेतनरचना लागू होणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आखातात काम करणाऱ्या भारतीयांच्या पगारावर प्राप्तीकर लागू केला जाणार असल्याचे म्हटले होते. नवा कायदा केवळ आखातात काम करणाऱ्याचा पगार कररचनेत आणण्यासाठी केला गेला आहे. त्यामुळे त्याला स्पेशल गल्फ वर्कर्स टॅक्स असेच म्हणायला हवे.
मात्र, सितारामन यांनी हा दावा फेटाळला आहे. त्यांनी सांगितले की फायनान्स अॅक्ट २०२१ हा कोणत्याही नव्या स्वरुपात आणला जाणार नाही. त्यामुळे आखातात काम करणाऱ्या भारतीयांना टॅक्स भरावा लागणार नाही. त्यांनी दिलेली सवलत पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे.
सितारामन म्हणाल्या फायनान्स अॅक्ट २०२१ मध्ये बदल करून केवळ टॅक्स कोणाला भरावा लागेल हे अधोरेखित केले आहे. आखातात काम करणाऱ्यांच्या पगारावर प्राप्तीकर आकारायची कोणतीही तरतूद त्यामध्ये नाही.