• Download App
    भारतासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचा मदतीचा हात: सुंदर पिचाई - सत्या नडेला हळहळले Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus

    भारतासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गुगलचा मदतीचा हात: सुंदर पिचाई – सत्या नडेला हळहळले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: कोरोनाच्या विध्वंसानंतर  आता अनेक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरुन भारताकडे मदतीचा ओघ सुरु झाला असतानाच आता मायक्रोसॉफ्ट आणि गुगल जगातील दोन बलाढ्या कंपन्याही भारताला मदत केली आहे . मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करुन भारताला मदत करत असल्याचे सांगितले. Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus

    भारतामधील सध्याची परिस्थिती पाहून माझे हदय विदीर्ण झाले आहे. अमेरिकेने भारताला मदत करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आभारी आहे. कोरोनावरील उपचारांसाठी लागणारी आर्थिक मदत, वैद्यकीय उपकरणे आणि ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्सच्या खरेदासाठी मायक्रोसॉफ्ट आवाज उठवत राहील, असे सत्या नाडेल यांनी सांगितले.

    “भारतामधील करोनासंदर्भातील चिंताजनक परिस्थिती पाहून धक्का बसला आहे.

    तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी गुगलकडून 135 कोटींचा निधी पुरवाल जाईल, अशी घोषणा केली. गिव्ह इंडिया, युनिसेफ, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही मदत पुरविली जाईल, असे सुंदर पिचाई यांनी स्पष्ट केले.

    Google CEO Sundar Pichai and Microsoft CEO Satya Nadella announce to help India in battle agains Coronavirus

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य