भारत बायोटेक जूनपासून कोविड -19 वरील लस कोवाक्सिनच्या लहान मुलांवरील चाचण्यास प्रारंभ करू शकेल, असे कंपनीचे बिझिनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकेसी हेड डॉ. रॅश एला यांनी सांगितले.GOOD NEWS: Central government in action before the third wave; Trials of covacin on infants from June
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आतापर्यंत अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सीन (Covaxin) लसीच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे.
भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा आहे .
सध्या कोव्हॅक्सिनचे उत्तम परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही ७० कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला १५०० कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.
GOOD NEWS : Central government in action before the third wave; Trials of covacin on infants from June
महत्वाच्या बातम्या
- योगी आदित्यनाथांचा कठोर निर्णय, रेमडेसिीवीरचा काळबाजार करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशात रासुकाखाली कारवाई, संपत्तीही जप्त होणार
- पाकिस्तान्याशी मोबाईलवरून बोलताना गुप्तचर विभागाने पकडले, हेरगिरी करणाऱ्या शिक्षिका बहिणींना अटक
- डॉ. हर्षवर्धन यांच्या पत्रानंतर योगगुरू रामदेवबाबांकडून वादग्रस्त विधान मागे
- पुण्यात पहिल्या लाटेतच ६९ टक्के नागरिकांना कोरोना, सिरो सर्व्हेमध्ये झाले उघड
- टाटा स्टिल कंपनीचा निर्णय : कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वयाच्या साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च