• Download App
    निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ|Good day for exports, 80 per cent increase in exports in the first week of May

    निर्यातीसाठी अच्छे दिन, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीत ८० टक्के वाढ

    भारतीय निर्यातीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. भारतीय निर्यात ७.०४ बिलीयन डॉलर्स म्हणजे सुमारे ५० हजार कोटीवर पोहोचली आहे. गेल्या याच काळात ३.९१ बिलीयन डॉलर्सची निर्यात झाली होती.Good day for exports, 80 per cent increase in exports in the first week of May


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय निर्यातीचे सकारात्मक चित्र पुन्हा एकदा समोर आले असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्यातीमध्ये ८० टक्के वाढ झाली आहे. भारतीय निर्यात ७.०४ बिलीयन डॉलर्स म्हणजे सुमारे ५० हजार कोटीवर पोहोचली आहे. गेल्या याच काळात ३.९१ बिलीयन डॉलर्सची निर्यात झाली होती.

    याच काळात भारता होणारी आयातही ८०.७ टक्यांनी वाढली आहे. भारताने ८.८६ बिलीयन डॉलर्स इतकी आहे. गेल्या वर्षी याच काळात ही आयात ४.९१ बिलयन डॉलर्स होती.



    एप्रिल महिन्यात भारताने ३०.२१ बिलीयन अमेरिकन डॉलर्सची निर्यात केली. गेल्या वर्षीपेक्षा निर्यातीत तीन पट वाढ झाली आहे. गेल्या वर्षीची याच काळातील निर्यात १०.१७ बिलीयन डॉलर्स होती.

    हिरे आणि दागिने, जुट, कारपेट, हस्तकलेच्या वस्तू, चामड्याच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तेलबिया, बदाम, इंजिनिअरींग उत्पादने, पेट्रोलियम उत्पादने आणि केमिकल्सची निर्यात वाढली आहे.

    फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑरगनायझेशनचे अध्यक्ष एस. के. सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर निर्यातीच्या ऑर्डर मिळत आहेत. त्यामुळे निर्यात क्षेत्र दमदारपणे वाटचाल करत आहे. सरकारने निर्यातीभिमुख धोरणांचा अवलंब केल्यास निर्यातीमध्ये आणखी वाढ होईल.

    Good day for exports, 80 per cent increase in exports in the first week of May

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली