- वाणिज्य मंत्रालयाने सोन्यावरील सीमा शुल्क फक्त 4 टक्के ठेवण्याची घोषणा केली आहे. परिणामी मार्केटमध्ये सोन्याला पुन्हा झळाळी मिळणार आहे.
- आत्तापर्यंत सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. त्यामध्ये घट करून ते 4 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले आहे.
- शुल्क आकारणी कमी केल्यास चोरट्या मार्गाने होणारी सोन्याची आयात कमी होईल आणि सरकारी तिजोरीत गंगाजळी वाढेल
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :मुंबई : Gold Import Duty सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे. सोन्यावरील आयात शुल्कामध्ये कपात करण्याचा प्रस्ताव वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सादर करण्यात आला होता त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.त्याचा परिणाम थेट सोन्यासंबंधीचे शेअर आणि ज्वेलरी शेअरवर दिसून आला.GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed
सध्या सोन्यावर 7.5 टक्के आयात शुल्क मोजावे लागते. सोबतच 2.5 टक्क्यांचा कृषी सेस (Agriculture Cess) वेगळा आकारला जातो. त्यामुळे सोन्यावर एकूण 10 टक्के आयात शुल्क मोजावे लागते.
हे 10 टक्के आयात शुल्क वाचाविण्याच्या नादात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात देशात सुरु आहे. देशात येणा-या एकूण सोन्यात तस्करीने येणारे सोने 25 टक्के इतके आहे.
सर्वसामान्यांना काय ?
देशात सोन्याच्या किंमतीत जी अचानक उसळी आली होती. ती स्थिर होण्याची चिन्हे दिसतील. आज पन्नाशीच्या आसपास असलेले सोनं काही अंशी तरी घसरेल.
GOLD NEWS! Gold will be cheaper; Lower import duties; Decision of the Ministry of Commerce; Read detailed
विशेष प्रतिनिधी
- ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
- Asian Champions Trophy : चक दे ! भारताची पाकिस्तानवर ३-१ ने मात ; सेमीफायनलध्ये धडक ; भारत स्कोअर बोर्डवर अव्वल …
- SMRITI IRANI : महिला सशक्तिकरण-‘लड़की हूं, लड़ सकती हूं’च्या बाता मारणार्या कॉंग्रेसने ‘त्या’ आमदाराला निलंबित करावेस्मृती इराणी
- अबब ! मासेमारी करणाऱ्या एका कोळ्यांच्या जाळ्यात सापडला चक्क आयफोनचा खजिना