• Download App
    गोव्यातील निवडणुका प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले स्पष्ट|Goa elections will be fought under the leadership of Pramod Sawant, BJP national president J. P. Nadda clarified

    गोव्यातील निवडणुका प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच लढणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.Goa elections will be fought under the leadership of Pramod Sawant, BJP national president J. P. Nadda clarified

    गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्रीपाद नाईक यांना दिल्लीहून स्थानिक राजकारणात आणणार का? हा प्रश्न विचारला असता नड्डा म्हणाले, कोणीही काहीही इच्छा प्रकट केली, तरी निर्णय पक्षाने घ्यायचा असतो.



    श्रीपाद दिल्लीत चांगले काम करत आहेत. गोव्यात भाजपा आणखी वाढेल आणि पक्षाची उत्तरोत्तर प्रगती होईल याबाबत मी आशावादी आहे. २०१७ च्या तुलनेत आज २०२१ मध्ये गोव्यात भाजप पक्ष कितीतरी पटींनी वाढला आहे. राज्यात भाजपा सरकारकडून चांगले काम चालले आहे.

    कोविड महामारी व्यवस्थापन हाताळताना भाजपा सरकारने अनेक विकासकामेही केली. २०२१ पर्यंत मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होईल. गोव्यात फार्मा हब स्थापन करण्यासाठीही राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत.

    गोव्यात पक्षाच्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. राज्यात पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे.कॉँग्रेसकडे सध्या कोणताही मुद्दा नाही. त्यामुळे अनेक तथ्यहिन मुद्दे ते उकरून काढत आहेत. त्यामुळेच पेगॅसिससारख्या खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत, असा आरोपही नड्डा यांनी केला.

    Goa elections will be fought under the leadership of Pramod Sawant, BJP national president J. P. Nadda clarified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका