वृत्तसंस्था
पणजी : गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा माझा साडे तीन वर्षांचा काळ पूर्ण झाला आहे. इथून पुढच्या काळात भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे, असे मावळते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. गोव्यात भाजपने माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. ती मी पार पाडली आहे. भाजपला 40 पैकी 20 जागांवर विजय मिळवून देण्यात माझा वाटा राहिला आहे. माझे काम मी केले आहे. इथून पुढे भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे, असे डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. Goa Dr. Pramod Sawant: BJP is ready to accept the responsibility
– वक्तव्याचा राजकीय अर्थ
प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यातून विविध राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, आज मणिपूरमध्ये विद्यमान मुख्यमंत्री बिरेन सिंग यांच्याकडे भाजपने पुन्हा मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पुन्हा जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे. भाजप देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, या वक्तव्यातून डॉक्टर सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सूचित केल्याचे मानले जात आहे.
– उद्या 4.00 वाजता विधीमंडळ पक्षाची बैठक
साडेतीन वर्षांच्या काळात कोरोना यासारख्या संकटांचा गोव्यातल्या जनतेने चांगला सामना केला गोव्यात याच कालावधीत पायाभूत सुविधांची मोठी कामे झाली, याकडे देखील डॉ. सावंत यांनी लक्ष वेधले आहे. उद्या सोमवारी दुपारी 4.00 वाजता गोवा भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होत आहे. केंद्रीय निरीक्षक म्हणून कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि केंद्रीय मंत्री मुरुगन या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होत आहेत. या बैठकीतच विधिमंडळ पक्षाचा नेता निवड होईल आणि तेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असे डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
– विश्वजित राणेंची नाराजी कशी दूर करणार?
काँग्रेस मधून भाजप मध्ये आलेले वरिष्ठ नेते आमदार विश्वजित राणे नाराज असल्याची चर्चा गोव्याचा राजकीय वर्तुळात आहे. डॉ. प्रमोद सावंत दिल्लीत असताना विश्वजित राणे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच त्यांना मुख्यमंत्रीपदाची बाबत विचारले असता मला प्रश्न विचारण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना प्रश्न विचारा, असे चिडून उत्तर त्यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर गोव्यात मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत.
उद्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा तीव्र असणार की एक मताने मुख्यमंत्री निवडला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर विश्वजित राणे पुढची कोणती भूमिका घेणार त्यांना भाजप कोणत्या पदावर बघून समाधान करणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.