• Download App
    गोव्यात कर्फ्यू जाहीर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश, पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे |Goa announces curfew, orders closure of all public events, no-covid certificate mandatory for tourists

    गोव्यात कर्फ्यू जाहीर, सर्व सार्वजनिक कार्यक्रम बंद करण्याचे आदेश, पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे

    गोव्यात कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अमलात असेल. सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी वगैरे सगळे कार्यक्रम रद्द ठरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत खुली राहतील. पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात  आले आहे.Goa announces curfew, orders closure of all public events, no-covid certificate mandatory for tourists


    विशेष प्रतिनिधी

    पणजी : गोव्यात कोविड रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारने शुक्रवारी राज्यव्यापी कर्फ्यू जाहीर केला. उद्या रविवारपासून पंधरा दिवस हा कर्फ्यू अमलात असेल.

    सर्व विवाह सोहळे, मुंज, शादी वगैरे सगळे कार्यक्रम रद्द ठरले आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत खुली राहतील. पर्यटकांना नो कोव्हिड प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात  आले आहे.


    सरकारने दोन महत्वाच्या चाचण्या मोफत केल्याने गोव्याचा कोरोना मृत्यूदर झाला कमी, विश्वजित राणे यांची माहिती


    मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कडक कफ्यूर्ची घोषणा केली. ते म्हणाले, लोक घरी राहतच नाहीत, अकारण फिरतात. त्यामुळे पोलिसांना लाठीचादेखील वापर करावा लागतो. येत्या रविवारी सकाळपासून दि. २४ मे सकाळी सहा वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असेल.

    कुणीच घराबाहेर पडू नये. फक्त सरकारी व खासगी इस्पितळ कर्मचाºयांना कामासाठी जावे लागेल. त्यांना कुणी अडथळे आणू नये. राज्यात जे पर्यटक येतील त्यांनी नो कोविड प्रमाणपत्र घेऊन यावे.जर असे प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी कोविड लसीकरण केले असल्याचा पुरावा सादर करावा.

    कफ्यूर्वेळी औषधालये सुरू राहतील. त्यांना वेळेचे बंधन नसेल. कारण नसताना जर कुणी रस्त्यावर फिरताना आढळले, तर पोलीस कारवाई करतील. कोविडची चेन ब्रेक करण्यासाठी हा उपाय आहे, असे ते म्हणाले.

    रेस्टोरंट्स नव्हे, तर टेक अवे सुरू राहील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत पंधराही दिवस खुली असतील. त्यामुळे लोकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. अन्य जे व्यवहार बंद राहतील त्याविषयीचा आदेश तपशिलाने शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी जारी करतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    राज्यात विवाह सोहळे कोविडसाठी सुपर स्प्रेडर ठरले. पन्नास लोकच विवाहात सहभागी व्हा असे सरकारने सांगूनदेखील लोकांनी गर्दी केली. नवरा किंवा बायकोला कोविड झालेला आहे

    असे कळून आल्यानंतरदेखील लोक लग्नाला गेले व कोविडग्रस्त झाले अशी उदाहरणे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. सर्वांनी विवाह, काजरा, मुंजी वगैरे कार्यक्रम रविवारपासून रद्द करावेत. कुणीच कसलाच व्यक्तिगत किंवा कौटुंबिक कार्यक्रम सध्या करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    Goa announces curfew, orders closure of all public events, no-covid certificate mandatory for tourists

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य