वृत्तसंस्था
पणजी : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या गोवा दौऱ्याची सुरुवात भाजपवर तोंडी तोफा डागून आणि काँग्रेस पक्ष फोडून केली असली तरी, दुपारनंतर त्यांनी गोव्यातल्या जनतेला साद घालण्याचा प्रयत्न केला. Glimpses from MamataOfficial visit to the Mangueshi Temple, Goa
“गोव्याची नवी सकाळ” ही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची नवी घोषणा आहे. त्याचेच मोठे बॅनर लावून ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचा पहिला कार्यक्रम घेतला.
दुपारी त्यांनी मंगेशीमध्ये सुप्रसिद्ध श्री मंगेश मंदिराला भेट देऊन श्री मंगेशाचे दर्शन घेतले. मंगेश देवस्थान ट्रस्टच्यावतीने ममता बॅनर्जी यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना ट्रस्टतर्फे श्री मंगेशाची प्रतिमा भेट देण्यात आली.
त्यानंतर त्यांनी गोव्यातील मच्छिमार समुदायाचे भेट घेतली. मच्छिमार समुदायाकडे गेल्या दहा वर्षात गोव्यातल्या सरकारने संपूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तृणमूल काँग्रेसचे सरकार गोव्यात स्थापन झाल्यानंतर मच्छीमारांच्या मालाला किमान समान भाव देण्यात येईल, असे आश्वासन तृणमूल काँग्रेसने दिले आहे. मच्छिमारांच्या निवेदनानंतर मच्छीमारांसाठी एक वेगळाच जाहीरनामा तृणमूल काँग्रेसने प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मच्छीमारांना मोफत बोटी देण्याचीही घोषणा आहे.
आज दिवसभराच्या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी सकाळी काँग्रेस पक्ष फोडला. काँग्रेसच्या नेत्या नफिसा अली आणि भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस या दोघांना तृणमूल काँग्रेस मध्ये प्रवेश देऊन घेतला. दुपारच्या वेळेत त्यांनी मंगेशीमध्ये श्री मंगेशाच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. तर सायंकाळी मच्छिमार समुदायाची भेट घेऊन गोव्यातल्या सामान्य जनतेशी आपले नाते जोडण्याचा प्रयत्न केला.
Glimpses from MamataOfficial visit to the Mangueshi Temple, Goa
महत्त्वाच्या बातम्या