Glenmark Pharma : कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लसीकरण आहे. आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून कोरोनावर हाताला सुईद्वारे टोचून देण्यात येणारी लस आलेली आहे. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीवरही विविध कंपन्यांचे संशोधन सुरू आहे. यातीलच एक ग्लेनमार्कतर्फे नेझल स्प्रेची चाचणी सुरू असून लवकरच त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सला सुरुवात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यांची ही लस कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचा दावाही ग्लेनमार्कने केला आहे. Glenmark Pharma anti covid 19 Nasal Spray third phase clinical trials to start soon
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीवर नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे लसीकरण आहे. आतापर्यंत जगभरातील विविध देशांकडून कोरोनावर हाताला सुईद्वारे टोचून देण्यात येणारी लस आलेली आहे. आता याच्या पुढचा टप्पा म्हणजे नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीवरही विविध कंपन्यांचे संशोधन सुरू आहे. यातीलच एक ग्लेनमार्कतर्फे नेझल स्प्रेची चाचणी सुरू असून लवकरच त्यांच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल्सला सुरुवात होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यांची ही लस कोरोनाविरुद्ध प्रभावी असल्याचा दावाही ग्लेनमार्कने केला आहे.
ग्लेनमार्क कंपनीने गत आठवड्यात नेझल स्प्रेची आयात आणि मार्केटिंगसाठी औषध नियामकांकडून आपत्कालीन मंजुरीची परवानगी मागितली होती. तथापि, औषध नियामकांच्या अधीन असलेल्या विषय तज्ज्ञ समितीने ग्लेनमार्कला तिसऱ्या टप्प्याची चाचणी घेण्याची शिफारस केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ग्लेनमार्कने कॅनेडियन कंपनी सनोटाइझशी हातमिळवणी केली आहे. कंपनीने म्हटले की, ते इतर उत्पादनांच्या इन-लायसेन्सिंगसाठी मूल्यांकन करत राहतील. कंपनीने असेही म्हटले की, कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात कंपनीने कायम पुढाकार घेतला आहे. त्यांचे औषध फॅबीफ्लू हे सौम्य ते मध्यम कोरोना व्हायरस उपचारांसाठी विकसित करण्यात आले आहे. या औषधाला डॉक्टर आणि रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही कंपनीने सांगितले.
Glenmark Pharma anti covid 19 Nasal Spray third phase clinical trials to start soon
महत्त्वाच्या बातम्या
- आनंदाची बातमी : पवित्र पोर्टलमधून लवकरच 6100 शिक्षणसेवकांची भरती, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
- राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात समाधानकारक पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
- केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलावर शिवसेनेची टीका, ‘हा तर निष्ठावंत भाजपवाल्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार!’
- कल्याण सिंग यांच्या निधनाची बातमी खोटी, तब्येतीत सुधारणा; हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा
- एसबीआयच्या ग्राहकांनो सावधान, चीनी हॅकर्सकडून केवायसीच्या नावाखाली होतेय फसवणूक