• Download App
    'भाजपला एक कोटी मते द्या, आम्ही फक्त 50 रुपयांत दारू देऊ!', आंध्रच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचे मतदारांना आवाहन । Give one crore votes to BJP, we will give alcohol for only 50 rupees Andhra BJP state president appeals to voters

    ‘भाजपला एक कोटी मते द्या, आम्ही फक्त ५० रुपयांत दारू देऊ!’, आंध्रच्या भाजप प्रदेशाध्यक्षांचे मतदारांना आवाहन

    आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मतदारांना आश्वासन दिले की, जर आंध्र प्रदेशात भाजप सत्तेवर आला तर ते 50 रुपये प्रति क्वार्टरच्या हिशेबाने “दर्जेदार” मद्याचा पुरवठा करतील. सध्या दर्जेदार दारूच्या क्वार्टरची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त आहे. Give one crore votes to BJP, we will give alcohol for only 50 rupees Andhra BJP state president appeals to voters


    वृत्तसंस्था

    हैदराबाद : आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष सोमू वीरराजू यांनी मतदारांना आश्वासन दिले की, जर आंध्र प्रदेशात भाजप सत्तेवर आला तर ते 50 रुपये प्रति क्वार्टरच्या हिशेबाने “दर्जेदार” मद्याचा पुरवठा करतील. सध्या दर्जेदार दारूच्या क्वार्टरची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त आहे.

    मंगळवारी विजयवाडा येथे पक्षाच्या जाहीर सभेला संबोधित करताना, वीरराजू यांनी लोकांना “निकृष्ट” दर्जाची दारू चढ्या किमतीत विकल्याबद्दल राज्य सरकारचा समाचार घेतला. राज्यात सर्वच बनावट ब्रँड्स चढ्या किमतीत विकले जातात, तर लोकप्रिय ब्रँड्स उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.

    भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील प्रत्येक व्यक्ती दारूवर महिन्याला 12 हजार रुपये खर्च करत आहे, जो त्यांना पुन्हा कोणत्या ना कोणत्या योजनेच्या नावाखाली सरकार देत आहे. वीरराजू म्हणाले की, राज्यात एक कोटी लोक दारूचे सेवन करत आहेत आणि २०२४ च्या निवडणुकीत एक कोटी लोकांनी भाजपला मतदान करावे अशी त्यांची इच्छा आहे. ७५ रुपये प्रति बाटली दराने ‘दर्जेदार’ दारू मिळेल आणि महसूल वाढला तर ५० रुपये प्रति बाटली दराने विकले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

    ‘सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारूचे कारखाने’

    हे विचित्र आश्वासन देताना वीरराजू म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाला एक कोटी मते द्या. आम्ही फक्त 70 रुपयांत दारू देऊ. आमच्याकडे आणखी महसूल वाढला तर आम्ही फक्त 50 रुपयांत दारू देऊ.

    सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे दारूचे कारखाने असून ते सरकारला स्वस्तात दारू पुरवतात, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्षांनी केला. भाजपची सत्ता आल्यास राज्यातील जनतेला मोफत शिक्षण आणि मोफत आरोग्य योजना देण्याचे आश्वासनही सोमू वीरराजू यांनी दिले. राज्यात दर्जेदार शिक्षण आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे आश्वासन देत शेतीला पर्यायही आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Give one crore votes to BJP, we will give alcohol for only 50 rupees Andhra BJP state president appeals to voters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार