• Download App
    18 वर्षांवरील प्रत्येकाला द्या कोरोनाची लस, डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेची पंतप्रधान मोदींना मागणी । Give corona vaccine to everyone above 18 years, IMA Letter To PM Modi

    18 वर्षांवरील प्रत्येकाला द्या कोरोनाची लस, डॉक्टरांच्या सर्वात मोठ्या संघटनेची पंतप्रधान मोदींना मागणी

    IMA Letter To PM Modi : कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट आता रुग्णसंख्येचे विक्रम मोडत आहे. दुसरीकडे, कोरोनाला अटकाव करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीमही जोमात सुरू आहे. परंतु असे असूनही परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच ढासळत आहे. आता वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. Give corona vaccine to everyone above 18 years, IMA Letter To PM Modi


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाने देशात पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. कोरोनाची ही दुसरी लाट आता रुग्णसंख्येचे विक्रम मोडत आहे. दुसरीकडे, कोरोनाला अटकाव करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीमही जोमात सुरू आहे. परंतु असे असूनही परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच ढासळत आहे. आता वाढलेल्या कोरोना संसर्गामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनने आवाहन केले आहे की, देशात लसीकरण मोहिमेला चालना देण्यासाठी आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही समाविष्ट केले जावे जेणेकरून कोरोना विषाणूचा लवकर प्रतिबंध होऊ शकेल. लसीकरण सर्वांसाठी खुले करा, अशी मागणी आता सर्वस्तरांतून जोर धरू लागली आहे, केंद्र सरकार आता यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

    देशातील लसीकरणाची स्थिती

    देशात मागच्या 24 तासांत 43 लाखांहून जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, मागच्या 24 तासांत लसीचे एकूण 43,00,966 डोस देण्यात आले आहेत. यात 39,00,505 लाभार्थींना लसीचा पहिला डोस, तर 4,00,461 लाभार्थींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

    आतापर्यंत झालेल्या लसीकरणापैकी 60 टक्के डोस महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि केरळात देण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, देशात झालेल्या एकूण 8,31,10,926 लसीकरणापैकी सर्वात जास्त 81,27,248 लसी महाराष्ट्रात देण्यात आल्या आहेत. त्या खालोखाल गुजरातेत 76,89,507, राजस्थानात 72,99,305, उत्तर प्रदेशात 71,98,372 आणि पश्चिम बंगालमध्ये 65,41,370 लसींचे डोस देण्यात आलेले आहेत.

    Give corona vaccine to everyone above 18 years, IMA Letter To PM Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य