मुली सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असा अजब तर्क उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी केला आहे.Girls run away as they talk on mobile, strange argument of Uttar Pradesh Women’s Commission members
विशेष प्रतिनिधी
लखनौ : मुली सातत्याने मोबाईलवरुन बोलताना दिसतात, त्यातूनच मॅटर तिथपर्यंत पोहोचतो, की लग्नासाठी मुली पळून जातात. त्यामुळे, मुलींकडे मोबाईल असल्यास त्या कुणाला बोलतात, काय करतात याकडे लक्ष द्यायला हवं, असा अजब तर्क उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या सदस्या मीना कुमारी यांनी केला आहे.
अलीगढसह राज्यातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मीना कुमारी म्हणाल्या, आपल्या मुली कुठे जातात, काय करतात याकडे पाहिले पाहिजे, कालच माझ्याकडे एक मॅटर आला होता,
वाल्मिकीची मुलगी आणि जाट समाजाचा मुलगा, ते माझ्याकडे आले होते. लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकल्यानंतर दोघांनी लग्न केले. त्यावेळी, गावातील लोकांनी पंचायत बोलावून, आम्ही त्यांना घरात घुसू देणार नसल्याचे म्हटले.
त्यामुळे, मुलींना मोबाईल देऊ नका. जर, देत असाल तर त्यांच्यावर लक्ष ठेवा, आईने दुर्लक्ष केल्यानंतरच मुलींची अशी अवस्था होते.