• Download App
    फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला! । Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानींचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : फुटीरवादी नेते सय्यद शाह गिलानी यांच्या दफनविधीपूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळलेला दिसतो. Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जम्मू आणि काश्मीार पोलिसांनी ‘यूएपीए’तंर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या झेंड्यात लपटलेल्या गिलानी यांच्या मृतदेहाभोवती बरेच लोक दिसतात आणि त्यात महिलांचे प्रमाण अधिक आहे. खोलीत घोषणाबाजी आणि गोंधळ होतानाही दिसतो. यात एक सशस्त्र पोलिस कर्मचारी देखील दिसतो.



    पाकिस्तानचे संकेतस्थळ ‘दुनियान्यूज’ च्या वेबडेस्कने सय्यद गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळण्यात आल्याचे वृत्त दिले आहे. गिलानी यांच्या मृतदेहाजवळ उभे असलेल्या नागरिकांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या, असे वृत्तात म्हटले आहे. याप्रकरणी यूएपीए (अनलॉफूल ॲक्टिव्हिटीज) कायद्यार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जम्मू काश्मी(रचे फुटीरवादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे बुधवारी निधन झाले. श्रीनगरच्या हैदरपूरा येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच काश्मीरर खोऱ्यात जमावबंदी लागू करण्यात आली. तसेच मोबाईल इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली. पाकिस्तान समर्थक फुटीरवादी नेत्याचे त्यांच्या निवासस्थानाजवळच एका मशीद परिसरात दफन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांचा मृतदेह घरात असताना पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळला होता.

    Gilanis body seen with Pakistani flag in vdo

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Andhra Pradesh : आंध्रमध्ये तिसऱ्या-चौथ्या मुलाच्या जन्मावर पैसे मिळतील; मुख्यमंत्री म्हणाले- जन्मदर वाढवण्याची गरज

    El Nino Risk : भारतावर अल-निनोचे सावट; दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा धोका वाढला, मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता

    Silver Imports : चांदीच्या आयातीवर सरकारने बंदी घातली:सिल्व्हर बारसह 3 श्रेणींचे नियम बदलले; परदेशातून मागवण्यासाठी परवानगी आवश्यक