• Download App
    गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान|Ghaziabad's women donates land worth Rs 10 crore to Baba Ramdev's Patanjali Yogpeeth

    गाझियाबादच्या दयावतींची दानशूरता, बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास दान दिली १० कोटी रुपयांची जमीन दान

    विशेष प्रतिनिधी

    मोदीनगर : गाझियाबाद येथील मोदीनगर परिसरात राहणाºया एका महिलेने दानशुरतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. दयावती या महिलेने बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठास तब्बल १० कोटी रुपयांची जमीन दान दिली आहे.Ghaziabad’s women donates land worth Rs 10 crore to Baba Ramdev’s Patanjali Yogpeeth

    ६३ वर्षीय दयावती यांचे सात वर्षांपासून जमीन दान करण्याचे स्वप्न होते. याचे कारण म्हणजे पतंजली  योगपीठ या परिसरात आले तर येथील लोकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. सात वर्षांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले. या कार्यक्रमास स्वत: बाबा  रामदेव उपस्थित होते.



    एकुलत्या एक असलेल्या दयावती यांनाही मुलबाळ झाले नाही. त्यामुळे त्यांच्या पित्याची सर्व संपत्ती त्यांच्याकडे आली. त्यांचे पती हरिकृष्णा सैन्यात होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर १५ वर्षांनी त्यांचेही निधन झाले. त्यामुळे दयावती एकट्याच राहिल्या. त्याचवेळी त्यांनी आपली सर्व संपत्ती पतंजली योगपीठास दान देण्याचे ठरविले. नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी बाबा रामदेव  यांनी पतंजली योगपीठास जमीन दान देणाऱ्या  दयावती  यांचे आभार मानले.

    दयावती म्हणतात, दानापेक्षा मोठे पुण्य कोणतेही नाही. स्वर्गाचे दार दानातूनच उघडते. पतंजली योगपीठ लाखो लोकांना रोगमुक्त करण्याचे काम निस्वार्थीपणे करत आहे. त्यामुळे त्यांनी आपली जमीन योगपीठास दान दिली आहे. येणाऱ्या  पिढ्यांना त्याचा फायदा होईल. दयावती यांनी आपली १५ बिघा जमीन दान दिली आहे.

    बाजारभावानुसार त्याची किंमत दहा कोटी रुपये आहे.बाबा  रामदेव म्हणाले, पतंजलीला जमीन दान देण्यासाठी अनेक जण तयार आहेत. मात्र, दयावती यांचा त्याग, भावना आणि समर्पण पाहून त्यांचेच दान घेण्याचे ठरविले.

    Ghaziabad’s women donates land worth Rs 10 crore to Baba Ramdev’s Patanjali Yogpeeth

     

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही