Ghaziabad : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर गाझियाबादचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसएसपी म्हणाले की, तपासणीत कोणताही धार्मिक अँगल सापडला नाही. तावीजवरील नाराजीमुळे ही मारहाणीची घटना घडली. ghaziabad ssp says no angle of religious incident found in investigation of viral video
वृत्तसंस्था
गाझियाबाद : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील लोणी भागात एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओबद्दल विविध दावेही केले गेले. या संपूर्ण प्रकरणावर गाझियाबादचे एसएसपी अमित कुमार पाठक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एसएसपी म्हणाले की, तपासणीत कोणताही धार्मिक अँगल सापडला नाही. तावीजवरील नाराजीमुळे ही मारहाणीची घटना घडली.
ते पुढे म्हणाले की, घटनेत सामील झालेल्या तीन जणांना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
9 जणांवर गुन्हा दाखल
एसएसपी पाठक यांनी स्पष्टपणे सांगितले की, व्हायरल व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्ट बेजबाबदार आहेत. ते म्हणाले की, जाणीवपूर्वक वेगळा अँगल देऊन सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात जणांव्यतिरिक्त पोलिसांनी ट्विटर आणि ट्विटर इंडियाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला की, लोणीतील काही तरुणांनी वृद्ध मुस्लिम अब्दुल समद यांना जबरदस्तीने मारहाण केली आणि जय श्री रामचा घोष करण्यास भाग पाडले. याशिवाय त्यांची दाढीही कापण्यात आली. तथापि, तपासणीत व्हायरल व्हिडिओचे सत्य काही वेगळेच ठरले. या वृद्ध व्यक्तीने काही तरुणांना तावीज दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तावीज कुचकामी ठरल्यामुळे चिडून त्यांना मारहाण झाली होती.
ghaziabad ssp says no angle of religious incident found in investigation of viral video
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत भाजप आणि शिवसेना कार्यकर्तांमध्ये घमासान, महिलांना मारहाण केल्याचा शिवसैनिकांवर आरोप
- कोव्हिशील्डच्या दोन डोसमधील शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानंतरच वाढवले, आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
- अभिनेता सोनू सूद, काँग्रेस आमदार सिद्दिकींच्या अडचणीत वाढ, कोरोना औषधासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे चौकशीचे आदेश
- जळगावची GI प्रमाणित केळी दुबईला, वर्षभरात भारताची 619 कोटी रुपयांची 1.91 लाख टन केळी निर्यात
- 5G Revolution : देशात 5G क्रांतीमुळे 1.5 लाखाहून जास्त रोजगारांची निर्मिती, वाचा सविस्तर आयुष्य बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी