वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलांमध्ये स्त्रीशक्तीचे योगदान वाढावे यासाठी संरक्षण मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. सैन्य दलाच्या सर्व प्रशिक्षण केंद्र आणि महाविद्यालयांमध्ये मुली आणि महिलांना पुढील वर्षीपासून प्रवेश देण्यात येतील.Gender equality in warfare; The growing contribution of women in the Indian Army; Important steps from the Department of Defense
त्यांना युद्धतंत्राचे सर्व कठोर प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि सैन्यदलाच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केली आहे. सैन्यदलामध्ये स्त्री-पुरुष भेद संपुष्टात येत असल्याची ग्वाही देखील दोघांनी दिली.
जागतिक पातळीवरील सैन्यदलांमध्ये स्त्रीशक्तीचे योगदान या विषयावरील वेबीनारमध्ये राजनाथ सिंह आणि जनरल बिपिन रावत सहभागी झाले होते. त्यामध्ये त्यांनी भारतीय सैन्य दलात महिला शक्तीचा वाढता वापर याविषयी आपले विचार व्यक्त केले.
केंद्रीय राखीव दलांपासून ते लष्कर नौदल आणि हवाई दल या सैन्य विभागांमध्ये सर्व पातळ्यांवर स्त्री शक्तीचा उपयोग करून घेण्यात येत आहे. भविष्यात अधिकाधिक महिलांना या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रत्यक्ष युद्ध काळात आणि युद्धभूमीवर महिला काम करू शकतील यासाठी त्यांना कठोर प्रशिक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही जनरल बिपिन रावत यांनी दिली.
युद्ध तंत्र आणि युद्ध भूमी या क्षेत्रांमध्ये पुरुष आणि महिला सैनिकांचे भेद हळूहळू संपुष्टात येतील प्रोफेशनल ट्रेनिंग मध्ये महिला देखील पुढे असतील, असे भाकीत जनरल रावत यांनी वर्तविले.
सैन्य प्रशिक्षण केंद्रे आणि महाविद्यालय यांच्यातील सर्व प्रकारची बंधने भारतात संपुष्टात आली असून महिलांचा या केंद्र आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुकर झाला आहे. पुढील वर्षीपासून सर्व प्रशिक्षण केंद्रे आणि महाविद्यालयांचे महिलांना प्रवेश देण्यात येतील, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
Gender equality in warfare; The growing contribution of women in the Indian Army; Important steps from the Department of Defense
महत्त्वाच्या बातम्या
- पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही
- दसरा मेळाव्यासाठी संघ दक्ष, नागपुरात जय्यत तयारी ; सरसंघचालक डॉ. भागवत यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधी
- बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीवर पंजाबचे आजी-माजी मुख्यमंत्री भिडले, कॅप्टन म्हणाले – देश मजबूत होईल, तर चन्नींचे केंद्रावर आरोप
- नाही म्हणणारे पवारच राज्य सरकार पाडतील निलेश राणे यांची जोरदार टीका