वृत्तसंस्था
जयपूर : पंजाबमध्ये नेतृत्व बदल झाल्यानंतर त्याचे पडसाद राजस्थान, छत्तीसगडमध्येही उमटले. तेथेही मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचाली सुरू आहेत. आज त्या हालचालींमध्ये एक “सूचक” भर पडली आहे.Gehlot’s demands, Modi’s response; In Rajasthan, the fragrance of “political mess” started wafting !!
राजस्थानात काही विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन झाले. त्यावेळी अर्थातच मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधानांकडे राजस्थानच्या विकासासाठी काही मागण्या केल्या. राजस्थानला केंद्राकडून कोणते विकास प्रकल्प हवे आहेत, याची यादी त्यांनी पंतप्रधान मोदींपुढे वाचून दाखविली.
पंतप्रधानांनी मोदींनी अशोक गहलोत यांच्या या भाषणाचा धागा आपल्या भाषणात अचूक पकडला. गेहलोत यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल मोदींनी त्यांचे आभार मानले. हे आभार मानत असतानाच त्यांनी राजकीय दृष्ट्या अनेक सूचक विधाने केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले, की मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले इंगित मला समजले. त्यांनी राजस्थानच्या विकासकामांची मोठी यादी या भाषणातून सांगितली. यातून त्यांनी जो माझ्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. हाच आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. वास्तविक त्यांच्या राजकीय पक्षाची आणि माझ्या राजकीय पक्षाची विचारधारा वेगळी आहे.
पण विकासासाठी आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा हेच आपल्या लोकशाहीचे वैशिष्ट्य ठरते. ही दोस्ती आणि लोकशाहीचे वैशिष्ट्य असेच पुढे चालत राहो, असा आशावादही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. नेमके हेच ते राजकीय सूचक विधान आहे.
जेव्हा पंजाब पाठोपाठ राजस्थानात देखील नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू आहेत. राजस्थानात बंडखोर नेते सचिन पायलट यांनी गेल्याच आठवड्यात राहुल गांधींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. तेथे काही “राजकीय खिचडी” शिजली आहे. हे लक्षात घेऊनच कदाचित मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपली स्वतंत्र वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला असावा.
असा निर्णय पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी घेतलाच आहे. कदाचित या पाठोपाठ अशोक गेहलोत देखील स्वतंत्र वाट चोखाळू शकतील याचीच एक चुणूक आजच्या राजस्थानातल्या सरकारी कार्यक्रमात दिसली. अशोक गेहलोत यांनी पंतप्रधानांची भाषणांमध्ये स्तुती केली.
त्यांच्याकडून मार्गदर्शन मागितले. राजस्थानच्या विकासासाठी मार्गदर्शन मागितले. पंतप्रधानांनी देखील उदार मताने ते देऊ केले. कदाचित येत्या नजीकच्या भविष्यातली हीच राजकीय मेख असू शकेल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भाषणे हेच सूचित करत आहेत.
तसेही सध्याच्या काँग्रेस हायकमांडला पक्षातले जुनेजाणते नेते नकोसे झाले आहेत कॅप्टन अमरिंदरसिंग यांना त्यांनी घालविले आहे कदाचित पुढचा नंबर अशोक गेहलोत यांचा असू शकेल हे लक्षात घेऊनच अशोक गहलोत यांनी आजच्या राजस्थानातल्या विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदींची जवळीक दाखविली असेल आणि मोदींनी देखील त्यांना तसाच प्रतिसाद दिला असेल असे मानण्यास वाव आहे.
Gehlot’s demands, Modi’s response; In Rajasthan, the fragrance of “political mess” started wafting !!
महत्त्वाच्या बातम्या
- महापौर किशोरी पेडणेकर : दोन डोस घेऊनही केईएम रुग्णालयात २२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
- पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच
- गोव्यात काँग्रेस परिवार एकत्र, पण मतांची मात्र विभागणी!!; मग पराभव कुणाचा?
- राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित द्या नवनीत राणांनी यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे आग्रह