प्रतिनिधी
नवी दिल्ली : ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी मोठी घोषणा केली आहे. या रेल्वे अपघातात आई-वडील गमावलेल्या सर्व मुलांच्या शालेय शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी गौतम अदानी यांनी उचलण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द गौतम अदानी यांनी रविवारी (4 जून) ट्विट करून ही माहिती दिली आहे.Gautam Adani took responsibility for the education of children who lost their parents in the Odisha train accident, informed himself
गौतम अदानी यांनी ट्विट केले की, ‘ओडिशातील रेल्वे दुर्घटनेमुळे आम्ही सर्वजण अतिशय दुःखी आहोत. या दुर्घटनेत ज्या निष्पापांनी आपले पालक गमावले आहेत, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचे आम्ही ठरवले आहे.
मुलांचे चांगले भविष्य घडवणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी
अदानी पुढे म्हणाले, ‘पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले भविष्य देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे.’ शुक्रवारी (2 जून) ओडिशातील बालासोर जिल्ह्यात झालेल्या या रेल्वे अपघातात 275 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात 1175 जण जखमी झाले असून त्यापैकी 793 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
Gautam Adani took responsibility for the education of children who lost their parents in the Odisha train accident, informed himself
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी यांनी मुस्लिम लीगला दिले धर्मनिरपेक्ष पक्षाचे प्रमाणपत्र, भाजपचा पलटवार- असे सांगणे त्यांची मजबुरी!
- Chief Minister Relief Fund : आता एका मिस्ड कॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला आज ३५० वर्षे पूर्ण
- मुंबईच्या मालवणीत बांगलादेशींनी उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा