अवघा देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राजधानी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 26 जानेवारी रोजी एका मुलीचा बदला घेण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर काही महिलांनी पीडितेचे केस कापले आणि तोंडाला काळे फासून तिची रस्त्यावरून धिंड काढली. Gang rape of a young girl in Delhi on Republic Day, Some womens cut the victims hair
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अवघा देश प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना राजधानी दिल्लीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. 26 जानेवारी रोजी एका मुलीचा बदला घेण्यासाठी तिचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर काही महिलांनी पीडितेचे केस कापले आणि तोंडाला काळे फासून तिची रस्त्यावरून धिंड काढली.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेची दखल घेत कठोर कारवाईचे आवाहन केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 महिलांना अटक केली आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करताना दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. त्यांनी पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे. मालीवाल यांनी सांगितले की, त्यांनी पीडितेची भेट घेतली. तिने तिच्यावर तीन जणांनी कसा सामूहिक बलात्कार केला हे सांगितले. तिच्या शरीरावर अमानुष जखमा आहेत. अवैध दारू विक्रेत्यांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे त्यांनी सांगितले.
वैयक्तिक वैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाहदरा येथील घटना दुर्दैवी असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आम्ही ४ जणांना अटक केली आहे. पीडितेला सर्व प्रकारची मदत आणि समुपदेशन केले जात असल्याचेही ते म्हणाले.
वृत्तानुसार, नोव्हेंबर २०२१ मध्ये शाहदरा येथे एका मुलाने आत्महत्या केली होती. यानंतर त्यांच्या मुलाने मुलीमुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. हा मुलगा त्या मुलीच्या मागे लागला होता. तर दुसरीकडे पीडितेच्या बहिणीनेही याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. तिने सांगितले की, पीडित बहीण विवाहित असून तिला एक मूल आहे. मुलाने आत्महत्या केल्यानंतर ती भाड्याच्या घरात राहत होती. मुलाच्या काकांनी तिचे अपहरण केले आणि नंतर तिच्यावर अमानुष अत्याचार घडले.
Gang rape of a young girl in Delhi on Republic Day, Some womens cut the victims hair
महत्त्वाच्या बातम्या
- श्वेता तिवारी म्हणाली, माझ्या ब्रा ची साईज देवच मोजत आहे, मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
- महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जबरदस्त धक्का, मालेगावच्या नगराध्यक्षांसह 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला; दहा दिवसात शरण येण्याचे आदेश